Vedaa Movie Poster  Saam Tv
मनोरंजन बातम्या

John Abraham: जॉन अब्राहमच्या 'वेदा'चे धांसू पोस्टर आऊट, अभिनेत्याच्या मागे उभी असलेली तरुणी आहे तरी कोण?

Veda Movie Release Date: जॉन अब्राहमने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या आगामी वेदा चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. जॉन अब्राहमच्या 'वेदा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये जॉन अब्राहम अतिशय दमदार अवतारात दिसत आहे.

Priya More

John Abraham Vedaa Film:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्याच्या 'वेदा' (Vedaa Movie) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पोस्टर आऊट करण्यात आले आहे.

या चित्रपटामध्ये जॉन अब्राहमसोबत अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जॉनच्या या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्याचे चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत चित्रपटाची रिलीज डेट जाहिर केली आहे.

जॉन अब्राहमने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या आगामी वेदा चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. जॉन अब्राहमच्या 'वेदा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये जॉन अब्राहम अतिशय दमदार अवतारात दिसत आहे. पोस्टरमध्ये अभिनेता संतप्त झालेला दिसत आहे.

यासोबतच त्याच्या मागे अभिनेत्री शर्वरी वाघ दिसत आहे. जी खूपच घाबरलेली दिसत आहे. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि राग देखील दिसत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांना खूप आवडले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून निर्मात्यांनी या चित्रपटातील जॉन आणि शर्वरीचा फर्स्ट लूक जारी केला आहे. चित्रपटाची रिलीज डेट आणि पहिले पोस्टर समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

जॉन अब्राहम शेवटी शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटात एक्स-एजंट म्हणून काम करताना दिसला होता. आता तो निखिल अडवाणीच्या आगामी वेदा चित्रपटात दमदार ॲक्शन करताना दिसणार आहे. निखिल आडवाणीने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'वेदा. तिच्यासाठी वाट पाहा. तिला एका रक्षकाची गरज आहे. तिच्याकडे शस्त्र आहे.' चित्रपट निर्मात्याने फक्त पॉवरफुल पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या नावाची घोषणा केली नाही तर चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. हा चित्रपट यावर्षी 12 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, वेदा चित्रपटामध्ये जॉन अब्राहमसोबत शर्वरी वाघ, तमन्ना भाटिया आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जॉन अब्राहम 2019 च्या अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'बाटला हाऊस' नंतर वेदा चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक निखिल आडवाणीसोबत काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल आडवाणी यांनी केले आहे. तर कथा असीम अरोरा यांनी लिहिली आहे. जॉन अब्राहमने अभिनयासोबतच चित्रपटाची निर्मितीही केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT