'बॉलिवूडचा भिडू' म्हणून अभिनेता जॅकी श्रॉफ यांची सिनेइंडस्ट्रीत अशी ओळख. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 'हीरो', 'राम लखन' आणि 'अल्लाह रक्खा' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये जॅकी यांनी अभिनय केला आहे. अनेक चित्रपटांच्या माध्यमातून जॅकी यांनी लोकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. आज १ फेब्रुवारी जॅकी श्रॉफ यांचा वाढदिवस. आज ते आपल्या फॅमिलीसोबत ६७ वा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहेत. या खास दिनानिमित्तं आपण जॅकी श्रॉफशी जोडलेल्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
जॅकी श्रॉफचा जन्म १ फेब्रुवारी १९५७ रोजी महाराष्ट्रामध्ये झाला आहे. त्यांचे खरे नाव जयकिशन काकूभाई श्रॉफ आहे. जॅकीने आपल्या करिअरमध्ये जवळपास २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॅकी श्रॉफ यांच्या लाईफमधलं स्ट्रगल चित्रपटाच्या कथेपेक्षाही काही कमी नाही. जॅकी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे. जॅकी यांना बालपणापासूनच त्यांचे मित्रमंडळी आणि चाळीतले सर्व लोकं 'जॅकी' अशीच हाक मारायचे. त्यांचं नाव फार मोठं असल्यानं त्यांना साधं सिंपल 'जॅकी' नावाने हाक मारायचे.
एकदा जॅकी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा होते. तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांची उंची पाहून त्यांना 'तुला मॉडेलिंगमध्ये इंटरेस्ट आहे का?' आणि तिथूनच त्यांची यशस्वी सिनेकारकिर्द सुरू झाली. जॅकीने १९७३ मध्ये 'हीरा पन्ना' चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला. या चित्रपटामध्ये जॅकी दादाची नकारात्मक भूमिका होती.
जॅकी यांचा अभिनयपाहून दिग्दर्शक सुभाष घई यांनी 'हीरो' चित्रपटातून जॅकी यांना १९८३ मध्ये लीड हिरो म्हणून निवड केली. या चित्रपटामध्येही जयकिशन श्रॉफ यांना 'जॅकी श्रॉफ' नावानं त्यांना लॉंच केलं आणि तेव्हापासून चाहते जॅकी श्रॉफ नावाने चाहते ओळखू लागले.
आपल्या मेहनतीच्या बळावर जॅकी यांनी बॉलिवूडमध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. माहितीनुसार आज जॅकी यांच्या नावावर २६ मिलियन डॉलर म्हणजे २०० कोटींहून अधिकची संपत्ती आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.