hrithik roshan  saam tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan Birthday: बापरे.... हृतिकने तोडले इतक्या तरुणींचे हृदय; घ्या जाणून २३ वर्ष जुनी गोष्ट...

ट्रॅफिक सिग्नलवर सुरू झाली होती हृतिक रोशनची प्रेमकहाणी.

Pooja Dange

Hrithik Roshan: हृतिक रोशनला बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हटले जाते. १० जानेवारी हा दिवस हृतिकच्या चाहत्यांसाठी खूप खास आहे. या दिवशी हृतिकचा वाढदिवस असतो. हृतिक आज म्हणजे 10 जानेवारीला त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे.

हृतिक रोशन शेवटचा सैफ अली खानसोबत विक्रम वेधा या चित्रपटात दिसला होता. विक्रम-वेधा या चित्रपटाला फार काही यश मिळाले नसले तरी हृतिकच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हृतिक केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर त्याच्या किलर लूकसाठी, उत्कृष्ट शरीरयष्टीसाठी आणि उत्तम नृत्यासाठी ओळखला जातो. चला तर मग त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी.

हृतिकने 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून त्याच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. हृतिक रोशनचा पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा हृतिक रोशनचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्याला 30,000 लग्नाचे प्रस्ताव आले होते. परंतु हृतिकने सुझान खानशी लग्न केले.

बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' हृतिक रोशन आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी सुझैन खान त्यांची प्रेमकहाणी एका ट्रॅफिक सिग्नलवर सुरू झाली. एक दिवस हृतिक गाडी चालवत होता. त्याला त्याच्या डाव्या बाजूला कारच्या ड्रायव्हिंग सीटवर एक सुंदर मुलगी दिसली. त्यानंतर लगेचच दोघांची मैत्री झाली. 'कॉफी विथ करण'च्या एका भागामध्ये सुझैनने याचा खुलासा केला आहे. हृतिकने सुझैनला लग्नासाठी कसे प्रपोज केले याबद्दल ती या कार्यक्रमात बोलली आहे. दोघांनी 20 डिसेंबर 2000 रोजी लग्नगाठ बांधली.

2006 मध्ये दोघे पहिल्या अपत्याचे आई-वडील झाले आणि 2008 मध्ये सुझानने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. 13 डिसेंबर 2013 रोजी, 13 व्या लग्नाच्या वाढदिवसापूर्वी, हृतिक रोशन आणि सुझैन खान त्यांचे 17 वर्षांचे नाते संपल्याची घोषणा केली. सध्या हृतिक रोशन सबा आझाद डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amol Khatal : नाकर्तेपणामुळे लोकांनी थोरातांना घरी बसवल्याने ते वैफल्यग्रस्त; आमदार अमोल खताळ यांची बाळासाहेब थोरातांवर टिका

Maharashtra Live News Update : - खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला

Moringa Ladoo: ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी खा मोरिंगाचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत; शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी? पाहा VIDEO

Maa OTT Release: थिएटरनंतर काजोलचा 'माँ' ओटीटीवर होणार प्रदर्शित; हा हॉरर चित्रपट कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT