Pravin Tarde: ...म्हणून सिनेमागृहात पॉपकॉर्नची किंमत कमी करावी; प्रवीण तरडेची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

प्रेक्षक चित्रपटगृहांकडे का पाठ फिरवतात? प्रवीण तरडे यांनी सांगितले नेमकं कारण.
Pravin Tarde
Pravin TardeSaam Tv
Published On

Mulshi Pattern 2: प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळालेला मराठी चित्रपट मुळशी पॅटर्नचा आगामी भाग अर्थात दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रवीण तरडे यांनी आज महाराष्ट्र किंग आणि क्विन स्पर्धा २०२३ या कार्यक्रमात चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली. पॉपकॉर्नची किंमत कमी करावी. अशी मागणी यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

Pravin Tarde
Avatar: The Way of Water: 'अवतार द वे ऑफ वॉटर' भारतात अजूनही यशस्वी घोडदौड सुरुच, अनेक रेकॉर्ड काढले मोडित...

यावेळी कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस तसेच बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ हे देखील उपस्थित होते. 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनी अक्षशः डोक्यावर घेतला होता. आता याचा दुसरा भाग येणार असल्याने सर्वांनाच चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता लागली आहे.

'मुळशी पॅटर्न' या सिनेमामध्ये उद्योगांसाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांची भयानक कहाणी मांडली होती. जमिनी गेल्याने हाताला काम नाही, आलेला पैसा खर्च करण्याची बुद्धी नाही; त्यामुळे गुन्हेगारीकडे तरुण कसे वळले? याबद्दलचं त्यात चित्रण केलं आहे.

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी गुन्हेगारी विश्वाचं अचूक आणि नेमकं चित्रण या चित्रपटात केल्याने रसिकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. चित्रपटामधले संवाद, सीन आणि कथानक; सगळंच जबरदस्त होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढच्या भागाची सर्वांनाच प्रतीक्षा होती.

सोबतच यावेळी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठी प्रेक्षकांना मल्टिफ्लेक्स मध्ये जाऊन सिनेमा पाहिला आवडतो पॉपकॉर्न महाग असल्याने चित्रपट पाहायला आवडत नाही. त्यामुळे पॉपकॉर्नची किंमत कमी करावी. अशी मागणी यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com