Hrithik Roshan and Saba Azad Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan: आधी रिलेशनशिप अन् आता लग्नाची चर्चा, हृतिक रोशन कोणासोबत करणार दुसरं लग्न? कोण आहे 'ही' अभिनेत्री

बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन सध्या सबा आझादसोबतच्या रिलेशनबद्दल फार चर्चेत आहे.

Chetan Bodke

Hrithik Roshan And Saba Azad: बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या सबा आझादसोबतच्या (Saba Azad) रिलेशनबद्दल फार चर्चेत आहे. सुरुवातीला दोघांनीही आपल्या नात्याबद्दल गुपित ठेवलं होतं, पण आता हे क्युट कपल सध्या आपल्या प्रेमामुळे बरेच चर्चेत आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये पुर्वाश्रमीची पत्नी सुझैन खानशी घटस्फोट घेतल्यानंतर हृतिक आता पुन्हा दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, ही जोडी सध्या जुहूमध्ये एकत्र राहत आहेत. त्यांनी जुहू वर्सोवा लिंक रोडवर एक अलिशान घर देखील खरेदी केली आहे. आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी मिळत आहे.

दोघांनाही वयाच्या फरकामुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. साबा आझाद आणि हृतिक रोशन नकतेच विमानतळावर लिप लॉक करताना दिसले. आता बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कियारा-सिद्धार्थ 2023 मध्ये लग्नबंधनात अडकल्यानंतर बॉलिवूडची ही जोडी देखील लग्न करू शकते. बातमीवर विश्वास ठेवला तर दोघेही याच वर्षी नोव्हेंबरमध्ये 2023 मध्ये लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

मिडिया रिपोर्टसनुसार, सबा आझाद आणि हृतिक रोशन यांची भेट ट्विटरच्या माध्यमातून झाली होती. काही दिवस बोलल्यानंतर दोघांनी डिनरवर एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विशेष म्हणजे केवळ हृतिकच नाही तर त्याची पुर्वश्रमीची पत्नी सुझानचेही सबा आझादसोबत चांगले संबंध आहेत.

हृतिकची पुर्वाश्रमीची पत्नी सुजैन खानची आणि सबा आझादची मैत्री फार चांगली आहे. सोबतच हृतिकच्या परिवारातही खूप चांगले संबंध आहे. तिने त्याच्यासोबत अनेक सण साजरे केले आहेत. अनेकदा त्यांनी सणही एकत्र साजरे केले आहेत.

सबा आझादच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर ती व्यवसायाने संगीतकार आहे, याशिवाय ती अनेक भारतीय चित्रपटांमध्येही आहे. हृतिक रोशन लवकरच 'फाइटर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना त्याची आणि दीपिका पदुकोणची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT