Womens Day 2023: महिला प्रेक्षकांना 'झिम्मा'च्या दिग्दकांकडून खास गिफ्ट, महिला दिनाचे औचित्य साधत केली खास घोषणा

महिला दिनाचे औचित्य साधत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'झिम्मा' पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Jhimma On Women's Day Special Offer
Jhimma On Women's Day Special OfferSaam Tv

Jhimma On Women's Day Special Offer: हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या सुपरहिट चित्रपटाने गेल्या वर्षी प्रेक्षकांना विशेषतः महिलांना अक्षरश: वेडं लावलं होतं. आता हा आनंद पुन्हा एकदा महिलांना थिएटरमध्ये अनुभवता येणार आहे. निमित्त आहे ८ मार्चचे अर्थात जागतिक महिला दिनाचे. याच खास दिवसाचे औचित्य साधत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'झिम्मा' पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट आठवड्यावर चित्रपटगृहांत झळकणार आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Jhimma On Women's Day Special Offer
Vaalvi: ‘वाळवी’ची यशस्वी हाफ सेंच्युरी, निर्मात्यांनी प्रेक्षकांना दिला खास नजराणा...

महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा प्रदर्शित होणाऱ्या 'झिम्मा' चित्रपटाबद्दल निर्माती क्षिती जोग म्हणतात, "माझं या चित्रपटाशी एक भावनिकदृष्ट्या नातं जोडलं गेलं आहे. हा चित्रपट मी पुन्हा एकदा महिलादिनी माझ्या मैत्रिणीसोबत बघून साजरा करणार आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा त्याच जोमात प्रदर्शित होणार आहे, याचा मला आनंद आहे. महिलांना हा चित्रपट आपल्या जीवनाशी भावनिकदृष्ट्या जवळीक साधणारा वाटला. अनेकींनी हा चित्रपट पाहून संसारातून वेळ काढत आपल्या मैत्रिणींसोबत सहलींचा बेतही बनवला. ज्या स्त्रिया कधीच चित्रपटगृहात गेल्या नव्हत्या, त्या खास 'झिम्मा' बघायला गेल्या. अनेकींनी यांचे हे अनुभव प्रत्यक्ष, सोशल मीडियाद्वारे, मेसेज करून आमच्यापर्यंत पोहोचवले. आयुष्य भरभरून जगायला शिकवणारा हा चित्रपट आहे."

'चलचित्र कंपनी' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com