Bollywood Actor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Harman Baweja Transformation : बॉलिवूड अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. हा अभिनेता नेमका आहे तरी कोण, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

एकेकाळी हृतिक रोशनशी व्हायची तुलना

अभिनेत्याने प्रियंका चोप्रासोबतही केले काम

सोशल मीडियावर बॉलिवूडच्या सुपरस्टारचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून हरमन बावेजा (Harman Baweja) आहे. एक काळ असा होता जेव्हा त्याच्या शरीरयष्टी आणि चेहऱ्याची तुलना थेट हृतिक रोशनशी केली जात असे, पण कालांतराने त्याच्या दिसण्यात झालेला हा मोठा बदल अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

हरमन बावेजाने प्रियांका चोप्रासोबत 'लव्ह स्टोरी २०५०' या सायन्स-फिक्शन चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर हरमन बावेजा 'व्हिक्टरी' आणि 'व्हॉट्स युअर राशी?' या चित्रपटांमध्ये दिसला. २०१४ मध्ये हरमन 'डिशकियाऊँ' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र चित्रपटांमधून अभिनेत्याला जास्त काही यश मिळाले नाही. यानंतर हरमन हळूहळू मोठ्या पडद्यापासून आणि चित्रपटसृष्टीपासून दूर गेला.

नुकताच अभिनेता हरमन बावेजा मुंबईत स्पॉट झाला आहे. त्याच्या बदललेल्या अवताराने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याचे वाढलेले वजन आणि नवीन लूक पूर्णपणे वेगळा आहे. व्हिडिओमध्ये हरमन बावेजा त्याची पत्नी साशा रामचंदानीसोबत दिसत आहे. साशा पांढऱ्या आउटफिटमध्ये दिसत आहे. तर हरमन बावेजा एका कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. हरमनने जांभळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जाड सनग्लासेस घातले आहेत. त्याचे वजनही वाढलेले दिसत आहे. पांढऱ्या दाढीमुळे तो पूर्णपणे वेगळा दिसत आहे.

चाहते पडले गोंधळात

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, अभिनेता त्याच्या कारमधून उतरून एका रेस्टॉरंटच्या दिशेने जाताना दिसत आहे. अभिनेत्याच्या या लूकवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. इतके दिवस चित्रपटांपासून दूर असलेल्या या अभिनेत्याला पाहून अनेक चाहते जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत, तर काहींना आश्चर्य वाटत आहे की अभिनेत्याला असे काय झाले आहे की त्याचा लूक इतका बदलला आहे. अनेकजण त्याच्या तब्येतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका युजरने लिहिलं की, "हरमनला काय झाले आहे? असे दिसते की अभिनेत्याची तब्येत आता ठीक नाही" दुसऱ्या युजरने लिहिले, "तो प्रियांका चोप्राच्या चित्रपटाचा हिरो आहे का?" आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं की, "हरमनला ओळखूही येत नाहीये. तो त्याच्या फिटनेसची काळजी का घेत नाही?" तसेच "लोक त्याला दुसरा हृतिक रोशन म्हणायचे आणि आता तो काय बनला आहे?" अशा असंख्य कमेंट्स व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

हरमन बावेजा सध्या काय करतो?

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता हरमन बावेजा चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही शोची निर्मिती करतो. त्याने 'सिस्टम', 'कॅप्टन', 'हक', 'मिसेस', 'फैकाल' आणि 'भगवद् चॅप्टर वन' यांसारख्या मालिका आणि चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'व्हॉट्स युअर राशी', 'इट्स माय लाईफ' आणि 'लव्ह स्टोरी २०५०' यांसारख्या चित्रपटांनंतर तो शेवटचा 'स्कूप'मध्ये दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT