Bollywood Actor Arrest x
मनोरंजन बातम्या

Bollywood Actor Arrest : मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्याला अटक, ३५ कोटींचे कोकेन जप्त

Bollywood Actor Arrest Chennai Airport : चेन्नई विमानतळावर एका बॉलिवूडच्या अभिनेत्याला अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.

Yash Shirke

  • चेन्नई विमानतळावर बॉलिवूड अभिनेत्याला ३.५ किलो कोकेनसह अटक झाली.

  • जप्त कोकेनची किंमत सुमारे ३५ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

  • डीआरआय आणि कस्टम्स संयुक्त कारवाईत बॉलिवूड अभिनेत्याला ताब्यात घेतले.

Arrest : मनोरंजन विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई विमानतळावर एका बॉलिवूडमधील अभिनेत्याला ३.५ किलो कोकेनसह अटक करण्यात आली आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ३५ कोटी असल्याचे म्हटले जात आहे. चेन्नई कस्टम आणि महसूल गुप्तर संचालनालय (डीआरआय) यांनी सोमवारी (२९ सप्टेंबर) संयुक्त कारवाईत या अभिनेत्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कस्टम्सच्या गुप्तचर युप्तचर युनिटने सिंगापूरहून चेन्नईला पोहोचलेल्या बॉलिवूड अभिनेत्याला चेन्नई विमानतळावर अटक केली. अभिनेत्याने चेक-इन केल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांना त्याच्या ट्रॉलीच्या तळाशी लपवून ठेवलेले पांढऱ्या रंगाच्या पावडरचे प्लास्टिकचे पाउच सापडले.

फील्ड ड्रग्स टेट्स केल्यानंतर अभिनेत्याकडून जप्त करण्यात आलेली पावडर ही कोकेन असल्याची स्पष्ट झाले. त्यानंतर अभिनेत्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, हा बॉलिवूड अभिनेता कंबोडियाहून सिंगापूरमार्गे चेन्नईला गेला होता ही माहिती समोर आली. अज्ञात व्यक्तींनी त्याला कंबोडियात ट्रॉली चेन्नई विमानतळावर रिसीव्हरला देण्यासाठी दिली होती, असा दावा अभिनेत्याने केला आहे. तो मुंबई किंवा दिल्लीतील कार्टेलसाठी हे अंमली पदार्थ घेऊन जात होता असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

डीआरआय अभिनेत्याशी संबंधित असलेल्या ड्रग्ज नेटवर्कचा मागोवा घेत आहे. त्याने यापूर्वी अंमली पदार्थांची तस्करी केली होती का याचा शोध घेण्यासाठी कस्टम्स त्याच्या विमानप्रवासाची तपासणी करत आहे. गेल्या दोन आठवड्यात चेन्नई विमानतळावर डीआरआयने कोकेन जप्त करण्याची ही दुसरी वेळ आहे. १६ सप्टेंबर रोजी इथिओपियाहून आलेल्या एका केनियन नागरिकाला अटक केली होती. १ सप्टेंबर रोजी चेन्नई कस्टम्सने चॉकलेट कॅनमध्ये लपवलेले ५.६ किलो कोकेन जप्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : 'मी तुझ्या वडिलांची हत्या..' नवऱ्याची हत्या करून बॅगेत भरलं; बायकोनं थेट मुंबई गाठली अन्..

वर्गात ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने मुस्लिम शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण|VIDEO

हनीमूनला गेल्यावर रूमची लगेच लाईट लावता? 'ही' चूक पडेल महागात? तज्ज्ञ काय सांगतात?

Chakli Tips: घरी असलेल्या चकल्या मऊ झाल्यात? या सोप्या टिप्सने पुन्हा होतील कुरकुरीत आणि खुसखुशीत

Maharashtra Live News Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसने केली मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT