Anupam Kher
Anupam Kher Twitter/ @AnupamPKher
मनोरंजन बातम्या

Anupam Kher: अनुपम खेर काश्मिरी पंडितांना करणार आर्थिक मदत, 'चित्रपटातून प्रचंड नफा कमावला, आता आपल्या लोकांना...'

Chetan Bodke

Anupam Kher Help On Kashmiri Pandit: 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सध्या बरेच चर्चेत आहे. 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता पुन्हा एकदा अनुपम खेर एका नवीन कारणामुळे चर्चेत आले आहे. नुकतंच अनुपम यांनी दिल्लीत पार पडलेल्या ग्लोबल काश्मिरी पंडित कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यात त्यांनी काश्मिरी लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केला.

अनुपम खेर यांनी ग्लोबल काश्मिरी पंडित कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमात ‘द काश्मीर फाइल्स’ बद्दलही भाष्य केले. यावेळी अनुपम खेर म्हणाले, “काश्मीर फाईल्स चित्रपटात काश्मिरी पंडितांच्या समस्या दाखवल्या आहेत. आम्ही या चित्रपटातून प्रचंड नफा कमावला आहे. आपण आधीच परदेशी संस्थांना दान करत त्यांना श्रीमंत केलं. आता आपल्या लोकांना, प्रियजनांना दान करणे आवश्यक आहे. याच काश्मिरी पंडितांसाठी मी ५ लाख रुपये देण्याचे वचन देत आहे.”

दिल्लीतील कार्यक्रमातून केलेल्या कामगिरीचे संपूर्ण देश त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहे. सोशल मीडियावर जितके त्यांचे कौतुक होत आहे, तेवढेच त्यांना नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे. नेहमीप्रमाणे त्यांच्या कृतीवर राजकीय स्थिती देत ट्रोलिंग होते.

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी काश्मिरी पंडितांसाठी यापूर्वी ही अनेक मोलाचे कार्य केले आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांच्या समस्या रुपेरी पडद्यावर येत जनतेला त्यांच्या समस्या माहित झाल्या. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास वर्ष होत आलं असून चित्रपटाचा प्रभाव आज ही प्रेक्षकांवर कायम आहे.

चित्रपटातील दाहकता आणि सत्यता प्रेक्षकांनी स्विकारण्यासाठी नकार दिल्याने चित्रपट बराच वादाच्या कचाट्यात सापडला होता. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’नंतर अनुपम खेर विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Today's Marathi News Live: गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण; गुंड गजानन मारणेचा व्हिडिओ व्हायरल

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

Matchstick Factory Video : माचीसच्या काड्या कशा बनवतात माहितीये? पाहा फॅक्टरीतला व्हिडिओ

Sharad Pawar News: '...म्हणून २००४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी सोडली'; छगन भुजबळांचे नाव घेत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट!

SCROLL FOR NEXT