Kiara Adwani: 'रुप सुहाना लगता है, चाँद दिवाना लगता है...' कियाराचं सौंदर्य लग्नानंतर आणखीनच निखळलं

नुकताच कियाराने लग्नानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली.
Kiara Adwani Status
Kiara Adwani StatusSaam Tv

Kiara Adwani: बॉलिवूडचे क्यूट कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी बरीच चर्चेत आहे. त्यांनी 7 फेब्रुवारीला जैसलमेरमध्ये लग्न झालेल्या या जोडप्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोबतच त्यांच्या कपड्यांची आणि दागिण्यांची देखील चर्चा बरीच होती. आता सिद्धार्थ आणि कियारा दोघेही लग्नानंतर आपापल्या कामावर परतले आहेत. नुकताच कियाराने लग्नानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली.

Kiara Adwani Status
Kangana Ranaut: 'अक्षय माझी पुरुष आवृत्ती झालाय...', कंगनाने अक्षय आणि करणला चांगलंच सुनावलं

सिद्धार्थने नुकतेच एका कार्यक्रमाला हजेरी लावत आपल्या कामाची सुरुवात केली आहे. आज पासून कियाराही तिच्या कामावर परतली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसत शूटिंगसाठी तयार होतानाचा हा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. ती सध्या कशासाठी शूटिंग करते हे अद्याप अस्पष्ट आहे.

Kiara Adwani Status
Akshay Kumar: 'भारत माझ्यासाठी सर्वस्व, कॅनडामध्ये फक्त..' अक्षय परदेशातील नागरिकत्वावर जरा स्पष्टच बोलला...
Kiara Adwani
Kiara AdwaniSaam Tv

कियारा सध्या कार्तिक आर्यनसोबत 'सत्यप्रेम की कथा' आणि एस शंकर दिग्दर्शित राम चरणसोबत 'RC 15'साठी शूटिंग करत आहे. गेल्या वर्षीच्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक असलेल्या 'भूल भुलैया 2' नंतर तिने पुन्हा कार्तिकसोबत काम केले. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नानंतर, करण जोहरने या जोडप्यासोबत तीन चित्रपटांचा करार केल्याची अफवा पसरली होती, परंतु चित्रपट निर्मात्याने या वृत्तांचे खंडन केले.

Kiara Adwani Status
Happy Birthday Shahid Kapoor: शाहिदसाठी करीनाने स्वत:च्या 'त्या' सवयी बदलल्या; दोघांच्या ब्रेकअपचं खरं कारण काय?

दरम्यान, सिद्धार्थ रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये दिसणार आहे. लग्नानंतर दोघेही त्यांच्या कामावर परतले आहेत आणि पूर्वीप्रमाणेच लोक त्यांना पुन्हा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com