Anupam Kher Filed Ayodhya Ram Mandir Inauguration Twitter
मनोरंजन बातम्या

Anupam Kher: अयोध्येत दाखल होताच अनुपम खेर यांनी घेतलं हनुमान गढीचं दर्शन; म्हणाले, “प्रभू श्रीराम यांच्याआधी…”

Anupam Kher Ayodhya Ram Mandir: अयोध्येमध्ये आज रामलल्लांचं दर्शन घेण्यापूर्वी अनुपम खेर यांनी हनुमान गढी मंदिरात जाऊन तिथे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी तिथे पूजा देखील केली. अनुपम खेर यांनी रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला.

Chetan Bodke

Anupam Kher Filed Ayodhya Ram Mandir Inauguration

संपूर्ण रामभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस आज उजडला आहे. अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभु श्रीराम विराजमान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला देशातील बडे राजकीय नेत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटीही या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) अयोध्येत पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी अयोध्येत पोहोचल्यानंतर माध्यमांसोबतही संवाद साधला. (AyodhyaTemple)

अयोध्येमध्ये आज रामलल्लांचं दर्शन घेण्यापूर्वी अनुपम खेर यांनी हनुमान गढी मंदिरात जाऊन तिथे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी तिथे पूजा देखील केली. अनुपम खेर यांनी रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला. “प्रभू श्रीरामांचे दर्शन करण्यापूर्वी हनुमानाचे दर्शन घेणं फार महत्वाचं आहे. मी गेल्या काही दिवसांपासून हनुमानावर एक छोटा व्हिडीओ बनवत आहे. माझ्या त्या व्हिडीओमध्ये, जवळपास २१ हनुमान मंदिरांचा समावेश आहे. मी गेल्या तीन महिन्यांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढी मंदिरामध्ये आलो होतो.” (Ram Mandir)

“सध्या अयोध्येत सर्वत्र 'जय श्री राम'चा जयघोष ऐकायला मिळत आहे. श्रीरामाच्या भक्तीत फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील हिंदू तल्लीन झाले आहेत. फक्त अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशामध्ये पुन्हा दिवाळी आली आहे, ही खरोखरची दिवाळी आहे.” अशी प्रतिक्रिया अभिनेते अनुपम खेर यांनी दिली आहे. (Bollywood Actor)

अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूडसह टॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली आहे. यावेळी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अजय देवगन, सनी देओल, हेमा मालिनी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, मधुर भंडारकर, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, रजनीकांत, ऋषभ शेट्टी, यश, प्रभास आणि मोहनलालसह अनेक सेलिब्रिटी काल सायंकाळीच अयोध्येत दाखल झाले आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT