Aamir Khan Buys New Apartment In Mumbai Pali Hil Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan Buys New Apartment : अबब... मिस्टर परफेक्शनिस्टने मुंबईत खरेदी केला ९ कोटींचा फ्लॅट, आमिर खानची संपत्ती माहितीये का ?

Aamir Khan Buys New Apartment In Mumbai Pali Hil : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने मुंबईमध्ये अलिशान घर खरेदी केलं आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहतावर्ग तयार केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फिल्म इंडस्ट्रीपासून दुर आहे. नुकताच आमिरने मुंबईमध्ये अलिशान घर खरेदी केलं आहे. स्क्वेअर यार्ड्स डॉट कॉमनुसार, मुंबईच्या पाली हिल भागात अभिनेत्याने ९. ७५ कोटींचं अपार्टमेंट खरेदी केलं आहे. हे नवीन खरेदी केलेलं घर आमिरच्या नावावर आहे.

हिंदुस्थान टाईम्सच्या माहितीनुसार, आमिर खानचं नवीन घर तयार आहे, तो ह्या घरात केव्हाही राहायला येऊ शकतो. अभिनेत्याने खरेदी केलेला फ्लॅट १०२७ स्क्वेअर फूट इतका आहे. २५ जून रोजी अभिनेत्याने या नव्या घराचे रजिस्ट्रेशन केले आहे. या घरासाठी आमिरने ५८. ५ लाखांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. तर ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फी भरली आहे. आमिरने नवीन खरेदी केलेलं घर, पालीमधील बेला विस्टा अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये त्याने हा फ्लॅट खरेदी केल्याची माहिती आहे. याशिवाय, आमिरचा पालीमधील मरीना अपार्टमेंटमध्येही फ्लॅट आहे.

आमिरचा मुंबईतील वांद्रे येथे दोन मजली सी फेसिंग फ्लॅट आहे. त्याचा तो फ्लॅट ५ हजार स्क्वेअर फूट जागेवर आहे. याशिवाय आमिरचा पंचगणीमध्ये देखील फार्महाऊस आहे. २०१३मध्ये त्यांनी ७ कोटींना हा फार्महाऊस खरेदी केला होता. त्याचा हा फार्महाऊस २ एकर परिसरात पसरलेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आमिरची उत्तर प्रदेशातही प्रॉपर्टी आहे. उत्तर प्रदेशमध्ये आमिरच्या नावावर जवळपास २२ घर आहेत.

५९ वर्षीय आमिर खानचे वडील ताहीर हुसैन खान प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. आमिरने आपल्या सिनेकरियरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. आमिर खान एक प्रसिद्ध अभिनेता असून तो लेखक आणि निर्माताही आहे. आमिरने २००१ मध्ये, "आमिर खान प्रॉडक्शन्स" नावाचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केले होते. काही मिडिया रिपोर्टनुसार, मार्च २०२४ पर्यंत अभिनेत्याची एकूण संपत्ती जवळपास १ हजार ८६२ कोटींच्या घरात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divorce: घटस्फोटानंतर दुग्धाभिषेक, केक कापला; जंगी सेलिब्रेशन करणारा तरुण आहे तरी कोण?

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

SCROLL FOR NEXT