Aamir Khan Birthday saam tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan Birthday: आमिर खान अभिनयातच नाही तर खेळातही ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’, राष्ट्रीय पातळीवरही कमावले होते नाव

Aamir Khan News: १९७३ मध्ये आलेल्या ‘यादों की बारात’ चित्रपटापासून सुरू झालेली आमिर खानची सिनेकारकिर्द आजही मोठ्या दिमाखात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत हिट चित्रपटांचा ‘मेळा’ लावणारा आमिर कधी 'राजा हिंदुस्तानी' तर कधी ‘गजनी’ झाला.

Chetan Bodke

Aamir Khan Birthday

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खानची सर्वत्र ओळख आहे. आज आमिर खान आपला ५९ वा वाढदिवस साजरा करतोय. १९७३ मध्ये आलेल्या ‘यादों की बारात’ चित्रपटापासून सुरू झालेली आमिर खानची सिनेकारकिर्द आजही मोठ्या दिमाखात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत हिट चित्रपटांचा ‘मेळा’ लावणारा आमिर कधी 'राजा हिंदुस्तानी' तर कधी ‘गजनी’ झाला. (Bollywood)

आमिरचे हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान ‘कयामत से कयामत तक’ च्या माध्यमातून कायमच लक्षात राहिल. कायमच आपल्या अभिनयासाठी चर्चेत राहणारा मिस्टर परफेक्शनिस्ट एक उत्तम तर आहेच पण तो एक उत्तम टेनिस खेळाडूही आहे. आज अभिनेता आमिर खानचा वाढदिवस आहे. आज आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल खास गोष्टी जाणून घेऊया. (Bollywood Film)

आमिर खानने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चित्रपट दिले आहेत. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपट म्हणजे 'दंगल'. या चित्रपटामध्ये तो एका कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसला होता. पण खऱ्या आयुष्यातही त्याला खेळात खूप रस होता हे फार कमी लोकांना माहीत आहे. शालेय जीवनात तो एक उत्कृष्ट टेनिसपटू होता. आमिरने अनेक राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये आणि राष्ट्रीय पातळीवरील चॅम्पियनशिपमध्ये अनेकदा त्याने सहभाग नोंदवला आहे. खुद्द आमिरचे वडील ताहिर हुसैन यांनी ही माहिती दिली. (Bollywood Actor)

१९८८ मध्ये रिलीज झालेल्या 'कयामत से कयामत तक' चित्रपटातून आमिरच्या सिनेकारकिर्दिला सुरुवात झाली. या चित्रपटानंतर आमिर रातोरात स्टार झाला होता. आमिरने आपल्या चाहत्यांना 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', '३ इडियट्स', 'लगान', 'रंग दे बसंती' आणि 'पीके'सह अनेक हिट चित्रपट चाहत्यांना दिले आहे. सोबतच आमिरला तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. एवढेच नाही तर फोर्ब्सकडून आमिर खानचा जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला होता. (Bollywood News)

आमिर खानने 'गुलाम' चित्रपटासाठी १० ते १२ दिवस अंघोळ केली नव्हती. प्रत्यक्षात घडले असे की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, क्लायमॅक्स सीन पूर्ण शूट करता येत नसताना, अभिनेत्याने १० ते १२ दिवस अंघोळ न करण्याचा निर्णय घेतला होता. यामागील कारण म्हणजे अभिनेत्याला भीती होती की अंघोळीमुळे त्याचा मेकअप निघून जाईल कारण त्याचा मेकअप काढला तर त्याचा लूक पुन्हा पूर्वीसारखा दिसणार नाही. म्हणून त्याने अंघोळंच केली नव्हती. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT