Manipur Violence Celebrity reaction Over Manipur women's Paraded Video Bollywood on Manipur Violence Latest updated in Marathi
मनोरंजन बातम्या

Bollywood on Manipur Violence : मणिपूर घटनेवर बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केला रोष, अत्याचाराचा व्हिडिओ पाहून सेलिब्रिटी म्हणाले...

Manipur Violence Latest updated in Marathi: मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून धिंड काढण्यात आली. या घटनेवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्वीटच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे.

Chetan Bodke

Manipur Violence Celebrity reaction Over Manipur women's Paraded Video: मणिपूर गेल्या दोन महिन्यांपासून अशांत आहे. हिंसाचाराच्या घटना सुरूच असताना माणुसकीला काळिमा फासणारा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर सध्या मणिपूर राज्यात तणाव वाढला आहे. एका जमावानं दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून त्यांना फिरवलं. त्यांचा भर रस्त्यात विनयभंगही करण्यात आला. सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत असून त्या घटनेवर सर्वच स्तरातून संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत. अशातच काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मणिपूरमध्ये त्या जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली असून रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतामध्ये त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून या घटनेवर काही बॉलिवूड अभिनेत्रींनी यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे. रेणुका शहाणे, उर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा, अक्षय कुमार यांनी ट्वीट करून संताप व्यक्त करत दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केलीय.

बॉलिवूड अभिनेत्री रेणूका शहाणे ट्वीट करत म्हणाली, “मणिपूरमधील अत्याचार रोखणारे कोणी नाही का? दोन महिलांचा तो व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडाला नसेल, तर स्वत:ला माणूस म्हणणं योग्य आहे का? भारतीय म्हणणं तर सोडून द्या!”

तर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला, उर्मिला मातोंडकर म्हणतात, “मणिपूरमधला तो थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहून धक्का बसलाय. मी घाबरलेय, हादरलेय, भयभयीत झालेय. हे प्रकरण मे महिन्यातील आहे, अद्याप आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. सत्तेच्या नशेत बसलेले आणि अशा घटनांवरही गप्प बसणारे सेलिब्रिटींना पाहून लाज वाटते. प्रिय भारतीयांनो आम्ही इथे कधी पोहोचलो?”

तर “लज्जास्पद! भयानक! नियम नसलेले!” अशी प्रतिक्रिया रिचा चड्ढाने सोशल मीडियावर दिली आहे. तर बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणतो, “मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ पाहून मन सुन्न झालेय, हा व्हिडिओ पाहून राग अनावर झालाय. मला आशा आहे की, दोषींना एवढी कठोर शिक्षा मिळावी की पुन्हा असं कोणीही विचित्र कृत्य करण्याचा विचारही करणार नाही.”

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर मणिपूर पोलिसांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ४ मे २०२३ रोजी दोन महिलांना निर्वस्त्र फिरवल्याच्या घटनेप्रकरणी नोंगपोक सेकमाई पोलीस ठाण्यात (जिल्हा -थौबल) अज्ञात शस्त्रधारी आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

राज्यातील परिस्थिती निवळण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन मणिपूर पोलिसांनी केले आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता त्यांची शाहनिशा करण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावरून संपर्क साधावा. शस्त्रे, दारूगोळा, स्फोटके पोलिसांकडे सोपवण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

SCROLL FOR NEXT