Marathi Actress Support In Gashmir Mahajani: ‘आम्ही तुझ्यासोबत आहोत...’ गश्मिरच्या मदतीला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची धाव; पोस्ट करत म्हणाली...

Gashmir Mahajani Support In Marathi Actress: वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल होणाऱ्या गश्मिरला काही सेलिब्रिटींनी सपोर्ट केला आहे.
Mrunmayee Deshpande Support In Gashmir Mahajani
Mrunmayee Deshpande Support In Gashmir MahajaniSaam Tv
Published On

Mrunmayee Deshpande Support In Gashmir Mahajani: देखणं रूप, भागदस्त आवाज, अभिनयातील खरेपण अशी ओळख असलेल्या अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाला धक्का बसला. रविंद्र महाजनी यांचं निधन १४ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील घरी झाले. त्या ठिकाणी अभिनेते गेल्या सात-आठ महिन्यांपासून एकटेच राहत होते. तर, त्यांचा मुलगा गश्मीर आई माधवी, पत्नी गौरी व मुलाबरोबर मुंबईला राहतो. वडिलांच्या निधनाची बातमी पोलिसांनी गश्मीरला दिली होती.

Mrunmayee Deshpande Support In Gashmir Mahajani
No Screens For Marathi Movie : बा विठ्ठला, मराठी चित्रपटांना थिएटर मिळू दे, निर्मात्यासह कलाकारांचे पंढरीत साकडं

सोशल मीडियावर रविंद्र महाजनींच्या मृत्यूची बातमी समोर येताच मुलगा गश्मिरला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केलं. तिकडे वडील तीन दिवसांपासून घरात मृतावस्थेत पडलेय तरी, सु्द्धा मुलाला त्यांच्या निधनाची माहिती नाही, हे कसं काय शक्य? अशा प्रकारे कमेंट्स करून त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.

घटनेच्या काही दिवसानंतर अभिनेत्याने एक पोस्ट केली होती, त्या पोस्टवरून अभिनेत्याने ट्रोलर्सला खडेबोल सुनावले होते. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून गश्मिरला काही सेलिब्रिटींनी सपोर्ट केला आहे.

अभिनेत्याची पोस्ट रिपोस्ट करत अभिनेत्री मृण्मयी गोडबोले हिनं ‘आम्ही तुझ्यासोबत आहोत’ अशा आशयाची स्टोरी शेअर केली आहे.

Mrunmayee Deshpande Support In Gashmir Mahajani
Mrunmayee Deshpande Support In Gashmir MahajaniFacebook

आपल्या वडिलांच्या निधनानिमित्त गश्मीर महाजनी म्हणतो, “ताऱ्याला ताऱ्यासारखंच राहू द्या.. मी आणि माझे कुटुंबीय शांतच राहणं पसंत करतोय. माझ्या न बोलण्याने जर मला मानहानी पत्करावी लागत असेल तर, इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे याचा मी स्वीकार करतो.. आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती. ते माझे वडील होते. माझ्या आईचे पती होते. तुमच्या सर्वांपेक्षा आम्ही त्यांना जास्त चांगलं ओळखतो. कदाचित योग्य वेळ आली की मी भविष्यात याविषयी बोलेन.”

Mrunmayee Deshpande Support In Gashmir Mahajani
Ishita Dutta Baby: अजय देवगणच्या ऑन स्क्रिन लेकीनं दिली गुड न्यूज, नेटकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रणजीत सावंत पोस्टमार्टम अहवालात म्हणतात, ‘शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात रविंद्र महाजनी यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा देखील नव्हत्या.’ रविंद्र महाजनींचे निधन गुरूवारी १३ जुलै रोजी झाली असल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप तरी या प्रकरणाचा व्हिसेरा रोखून ठेवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com