Akshay Kumar Reply On Pan Masala Ad Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar On Pan Masala Ad: पानमसाल्याच्या जाहिरातीवर अक्षय कुमारने दिलं स्पष्टीकरण, नेमकं सत्य काय आहे?

Akshay Kumar Reply On Pan Masala Ad: या जाहिरातीमुळे निर्माण झालेल्या वादानंतर आता अक्षय कुमारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Priya More

Akshay Kumar Video:

बॉलिवूडचा (Bollywood) 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) पानमसाल्याच्या जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. अक्षय कुमारने शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अजय देवगणसोबत (Ajay Devgn) या जाहिरातीमध्ये काम केले आहे. या जाहिरातीमुळे अक्षयला ट्रोल केले जात आहे. या जाहिरातीमुळे निर्माण झालेल्या वादानंतर आता अक्षय कुमारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

अक्षय कुमारने पानमसाल्याच्या एका ब्रँडसाठी दीड वर्षांपूर्वी जाहिरात केली होती. या जाहिरातीमुळे त्याच्यावर टीका झाली होती तसंच त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाल्यानंतर अक्षय कुमारने गेल्या वर्षी या पानमसाल्याच्या ब्रँडचे अॅम्बेसेडर पद सोडले होते. आता पुन्हा तो या पानमसाल्याच्या जाहिरातीमध्ये झळकल्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. अक्षय कुमारला या जाहिरातीमध्ये पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या. ट्रोलिंग झाल्यानंतर अक्षय कुमारने आता स्पष्टीकरण दिले आहे. ही जाहिरात प्रत्यक्षात २०२१ मध्ये शूट झाली होती, असं त्याने सांगितले.

अक्षय कुमारने बॉलिवूड हंगामाने ट्वीट केलेल्या बातमीवर रिप्लाय दिला आहे. त्याने असे लिहिले आहे की, 'ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून परत? ही जाहिरात १३ ऑक्टोबर २०२१ रोजी शूट करण्यात आली होती. या ब्रँडच्या जाहिरातींमधून मी माघार घेतल्याचे जाहीर केल्यापासून माझा या ब्रँडशी काहीही संबंध नाही. ते पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत कायदेशीररित्या आधीच शूट केलेल्या जाहिराती चालवू शकतात.शांत राहा आणि काही खऱ्या बातम्या करा.'

अक्षय कुमार दीड वर्षांपूर्वी या जाहिरातीमुळे ट्रोल झाला होता. तेव्हा अक्षय कुमारने चाहत्यांची माफी मागितली होती. त्याने पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. मी तंबाखूचे समर्थन करत नसलो आणि करणार नसलो तरीही गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिसादाने मला खूप प्रभावित केले आहे. वेलची ब्रँडशी असलेल्या माझ्या संबंधाबाबत मी तुमच्या भावनांचा आदर करतो. तसेच, मी जाहिरातीसाठी आकारले जाणारे जाहिरात शुल्क दान करण्याचा निर्णय घेतला आहे.'

Akshay Kumar Reply

अक्षय कुमारच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात अक्षयसोबत परिणीती चोप्रा देखील आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून 6 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. याशिवाय त्याचा 'वेदात मराठे वीर दौडले सात' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. दक्षिणेतील 'Soorarai Pottru' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही तो दिसणार आहे. त्याच्याकडे 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'स्काय फोर्स', 'हेरा फेरी 3', 'शंकारा' आणि 'सिंघम अगेन' हे चित्रपट देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT