मनोरंजन बातम्या

Ram Setu Teaser: अक्षय कुमारच्या 'राम सेतू'चा टीझर आला; 'या' तारखेला थिएटरमध्ये येणार

अक्षय कुमारच्या राम सेतू या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Shivani Tichkule

Ram Setu Release Date: अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'राम सेतू' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. आज नवरात्रीच्या मुहूर्तावर अक्षयने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि चित्रपटाचा टीझर (Ram Setu Teaser) आपल्या चात्यांसोबत शेअर केला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आज सकाळीच अक्षयने चित्रपटाच्या नवीन पोस्टरसोबत रिलीज डेटची घोषणा केली होती त्यांतर आता अक्षयने या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. (Akshay Kumar upcoming Movie Ram Setu)

या चित्रपटात अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. 2022 मध्ये अक्षय कुमारचे बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन आणि कठपुतली असे 4 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. कठपुतली हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. कठपुतली व्यतिरिक्त इतर चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत.

असे असले तरी अक्षय कुमारसोबतच त्याच्या चाहत्यांनाही खिलाडी कुमारच्या आगामी 'राम सेतू' या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. राम सेतूनंतर तो इमरान हाश्मीसोबत सेल्फी या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो राधिका मदानसोबत एका चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही.

या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार चित्रपट

राम सेतूचा डिजिटल पार्टनर प्राइम व्हिडिओज आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अक्षयने पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटाच्या ओटीटी पार्टनरची माहिती आधीच दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: पर्यटकांच्या बसमध्ये जाण्यासाठी बिबट्याची खिडकीवर झेप, पुढे काय झालं ते पाहाच

Vilas Bhumare : महायुतीचे विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले; हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु, प्रचार थांबला!

20-55 वयोगटासाठी रस्त्यावरील खड्डे ठरतायत धोकादायक; पाठदुखी-फ्रॅक्चरची समस्या बळावत असल्याचा डॉक्टरांचा इशारा

Shreeram Lagoo: अभिनयाची आवड, ४२ व्या वर्षी डॉक्टरकीला रामराम, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दल जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: शरद पवार यांच्या बॅगांची रायगडमध्ये तपासणी

SCROLL FOR NEXT