Raid 2 Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

Raid 2 Announcement: IRS अमय पटनायकची कोणाच्या घरावर ‘रेड’ पडणार?

Raid 2 News: राजकुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड’ चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे.

Chetan Bodke

Raid 2 Announcement

राजकुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड’ चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. नुकताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१८ प्रदर्शित झाला होता. तब्बल सहा वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर चित्रपटाच्या आगामी भागाची घोषणा केली. आता अमर पटनायक कोणाच्या घरी ‘रेड’ मारणार याचं उत्तर प्रेक्षकांना १५ नोव्हेंबर २०२४ रोजी मिळणार आहे. (Bollywood News)

अजयने या चित्रपटाची घोषण केल्यापासून इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाचीही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून रिलीज डेटदेखील समोर आली आहे. अजयचा ‘रेड’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. निर्मात्यांनी सिक्वेलबद्दल कोणतीही पुर्व कल्पना दिली नव्हती. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये चित्रपटाची घोषणा केल्यामुळे अजयचे चाहते चांगलेच खुश आहेत. (Bollywood Actor)

निर्माता आणि दिग्दर्शक अभिषेक पाठकने ‘रेड २’चं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, एका व्यक्तीचे पाय दिसून येत आहेत. ‘अमय पटनायक परतला आहे.’ असं या पोस्टरवर कॅप्शन दिलं आहे. २०१८ च्या ब्लॉकबस्टर ‘रेड’ च्या जबरदस्त यशानंतर, अजय देवगण दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणि निर्माते भूषण कुमार, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार पुन्हा एकत्र आले आहेत. (Bollywood Film)

चित्रपटाच्या शुटिंगला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये होणार असून नुकतंच मुंबईमध्ये शुटिंगला सुरुवात झाली आहे. ड्रामा आणि सस्पेन्ससोबत गंमत प्रेक्षकांना बघायला मिळणार यात शंका नाही. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी त्यांच्या T-Series आणि Panorama Studios या बॅनरखाली होत आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT