अभिषेक बच्चन हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या अनेक दमदार भूमिकांनी अभिषेकने बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. आज (५ फेब्रुवारी) अभिनेता अभिषेक बच्चनचा वाढदिवस... सिने जगतात फारसे यश मिळवले नसले तरी अभिषेक बच्चन करोडो संपत्तीचा मालक आहे. जाणून घेऊया, अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती... (Bollywood)
बॉलिवूडच्या स्टारकिड्समध्ये अभिषेकचा समावेश होतो. आई, वडील आणि खुद्द अभिषेक सुद्धा बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रिटींपैकी एक आहे. जरीही अभिषेक आपल्या खास अभिनयामुळे चर्चेत नसला तरी त्याचं दोनदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आलं आहे.
अभिषेक बच्चन आणि वडील अमिताभ बच्चन यांची नावे चित्रपटामध्ये विरुद्ध भूमिका साकारण्यासाठी गिनीज बुकमध्ये नोंदवली आहेत. 'पा' चित्रपटामध्ये अभिषेकने वडील अमिताभ यांचे पात्र तर, अमिताभ यांनी मुलगा अभिषेकचे पात्र चित्रपटामध्ये साकारलेय.
अशा हटक्या भूमिकेंमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अभिषेकचं नाव नोंदवलं तर दुसरं 'दिल्ली 6' चित्रपटाच्या प्रमोशनवेळी 12 तासांत वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रमोशनसाठी उपस्थित लावली होती. त्यामुळे अभिषेकचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं. (Bollywood Actor)
अभिषेक बच्चनकडे करोडोची संपत्ती आणि अनेक महागडे कार कलेक्शन आहेत. 'सीए नॉलेज'च्या रिपोर्टनुसार, अभिनेत्याची नेटवर्थ जवळपास २०३ कोटीं इतकी आहे. अभिषेक महिन्याला कोट्यवधींची कमाई करतो. अभिषेक बच्चन जाहिरातींमधून करोडोंची कमाई करतो. तो केवळ अभिनेता आणि उद्योगपतीच नाही तर एक यशस्वी निर्माताही आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चन एका चित्रपटासाठी १० कोटीं इतकं मानधन आकारतो. (Bollywood Film)
अभिषेक खरंतर अभिनयापेक्षा खेळामध्येच जास्त रस दाखवतो. अभिषेक बच्चनकडे सध्या दोन यशस्वी क्रीडा संघ आहेत. या संघांपैकी एक प्रो कबड्डी आहे, ज्याचे नाव पिंक पँथर्स आहे आणि दुसरा फुटबॉल संघ चेन्नईयिन एफसी आहे. या संघाने इंडियन सुपर लीग दोनदा जिंकली आहे. अभिषेक बच्चनला महागड्या कारचा खूपच शौक आहे. 5 आलिशान बंगल्यांव्यतिरिक्त, त्याच्याकडे अनेक महागड्या कार आहेत. अभिषेककडे Audi A8L, Mercedes Benz SL350D, Bentley Continental GT आणि Mercedes Benz AMG यांसारख्या अनेक महागड्या कारचं कलेक्शन आहे. (Bollywood News)
अभिषेक बच्चनने २००० मध्ये 'रिफ्युजी' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. फ्लॉप पदार्पणानंतरही अभिषेकने हिंमत हारली नाही आणि जे काही चित्रपट मिळाले त्यामध्ये तो भूमिका करत राहिला. मात्र एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट दिल्याने अभिषेक बच्चनवर फ्लॉप अभिनेता असा शिक्काही बसला होता. पण असं असलं तरीही त्याच्या सिनेकारकिर्दित हिट चित्रपटांची यादीही आहे. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.