बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. आता लवकरच ती Bhakshak या चित्रपटात दिसणार आहे. ज्याचा ती सातत्याने जोरदार प्रमोशन करत आहे.
भूमी पेडणेकर ही नेहमी प्रत्येक मुद्द्यावर आपले मत खुलून व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. आता अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान तिने तिच्यासोबत झालेल्या विनयभंगाची धक्कादायक घटना सांगितली आहे. तिने सांगितले की, जेव्हा ती फक्त 14 वर्षांची होती, तेव्हा कोणीतरी तिच्यासोबत चुकीची कृती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ती खूप घाबरली होती. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Hauterrfly ला दिलेल्या मुलाखतीत भूमीने या घटनेबद्दल बोलताना आपलं मन मोकळं केलं आहे. ती म्हणाली, ''मला आजही तो दिवस चांगलाच आठवतो, जेव्हा मी वांद्रे येते एका जत्रेत गेली होती.त्यावेळी मी खूप लहान होते. तेव्हा मी 14 वर्षांची होते. त्यावेळी मी माझ्या कुटूंबासह जत्रेत गेली असताना कोणीतरी माझ्या कंबरेला पाठीमागून वारंवार चिमटा काढत होता आणि मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. तो वारंवार असा करत होता.'' (Latest Marathi News)
या घटनेबद्दल सांगताना भूमी म्हणाली, ''जेव्हा हे सर्व घडत होते, तेव्हा मला ते कळत होतं. मात्र जेव्हा मी मागे वळून पाहिलं तर, तिथे कोणीच नव्हतं. त्यावेळी मी हा प्रकार कोणाला सांगितला नाही, कारण मला खूप धक्का बसला होता. नेमकं हे काय घडलं, ते मला समजलंच नाही. पण आजही मला आठवते की, त्या व्यक्तीने मला स्पर्श करण्याचा कसा प्रयत्न केला होता. तुमची इच्छा असूनही तुम्ही अशा घटनेच्या आठवणीतून लवकर बाहेर पडू शकत नाही.''
दरम्यान, भूमी पेडणेकरच्या अपकमिंग प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची थँक यू फॉर कमिंग या चित्रपटात दिसली होती. हा एक कॉमेडी ड्रामा असला तरी या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता लवकरच अभिनेत्री तिच्या आगामी 'Bhakshak' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.