Aamir Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

आमिर खानचा 'Sitaare Zameen Par' चित्रपटगृहानंतर ओटीटीवर नाही तर 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Aamir Khan- Sitaare Zameen Par : आमिर खानचा 'सितारे जमीन पर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या 'सितारे जमीन पर' चित्रपटासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत' चांगलाच चर्चेत आहे. प्रेक्षक या प्रोजेक्ट संबंधित जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. मात्र आमिर खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या रिलीजनंतर 'महाभारत' या ड्रीम प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. आमिर खानचा आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुखही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'सितारे जमीन पर' चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सितारे जमीन पर' रिलीजनंतर ओटीटीवर पाहता येणार नाही आहे. तर चित्रपट डायरेक्ट युट्यूबवर 'पे-पर-व्ह्यू' च्या स्वरूपात पाहता येणार आहे. 'सितारे जमीन पर' सिनेमा रिलीजनंतर दोन महिन्यांनी युट्यूबवर पाहता येईल. आमिर खानने 'सितारे जमीन पर' चित्रपट ओटीटीवर न घेऊन येता. थेट युट्यूबवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रेक्षकांना स्ट्रीमिंग प्रीमियरची वाट पाहण्यापासून परावृत्त करून सिनेमॅटिक अनुभव टिकवून ठेवण्यासाठी 'सितारे जमीन पर' चित्रपट ओटीटीवर रिलीज न करता युट्यूबवर 'पे-पर-व्ह्यू' च्या स्वरूपात दाखवण्यात येणार आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खान बास्केटबॉल शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

आमिर खान आणि जिनिलिया देशमुखसोबत चित्रपटात आरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी आणि सिमरन मंगेशकर हे कलाकार देखील झळकणार आहेत. 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा सिक्वेल 'सितारे जमीन पर' आहे. हा चित्रपट कुटुंबासोबत नक्की पाहावा. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT