Akshay Kelkar Wedding VIDEO
Akshay Kelkar WeddingSAAM TV

Akshay Kelkar Wedding : 'बिग बॉस'चा विजेता चढला बोहल्यावर, 'अक्षय केळकर'ची बायको आहे तरी कोण?

Akshay Kelkar Wedding VIDEO : 'बिग बॉस मराठी 4' चा विजेता अक्षय केळकर अखेर लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो पाहा. तसेच त्याची बायको कोण, जाणून घेऊयात.
Published on

'बिग बॉस मराठी 4' चा विजेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) अखेर लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. अक्षय केळकरला 'बिग बॉस' मधून खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्याचा 'बिग बॉस' मधील गेम चाहत्यांना खूप आवडला आहे. अक्षय केळकरने 9 मे रोजी लग्नगाठ बांधली आहे. त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अक्षय केळकरच्या बायकोचे नाव साधना काकतकर (Sadhana Kakatkar ) आहे.

अक्षय केळकर आणि साधना काकतकर 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 10 वर्षांच्या प्रेमानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. अक्षय-साधनाचा विवाह सोहळा खूप थाटामाटात पार पडला आहे. लग्नासाठी दोघांनी देखील पारंपरिक लूक केला होता. अक्षय केळकरने लग्नाचा व्हिडीओ टाकून त्याला एक खास कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की "शुभ मंगल सावधान..." सध्या अक्षय केळकरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होतो.

अक्षय केळकर साधनाला प्रेमाने रमा अशी हाक मारतो. त्याचा 'रमाक्षय' हा हॅशटॅग लग्नसोहळ्यात खूप गाजला. लग्नात साधनाने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, केसात गजरा, नाकात नथ आणि मॅचिंग दागिने घालून तिने हा लूक पूर्ण केला होता. मिनिमल पेकअपमध्ये साधना खूपच सुंदर दिसत होती. तर अक्षयने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात मग्न पाहायला मिळाले. तसेच दोघेही खूप आनंदी दिसत होते.

अक्षय केळकरची बायको कोण?

अक्षय केळकरची बायको साधना काकतकर ही एक लोकप्रिय गायिका आहे. तिने आजवर अनेक गाणी गायली आहेत. यात मेतरा, आनंदाचे गाव, नाखवा या सारख्या गाण्यांचा समावेश आहे. अक्षय केळकर हा एक उत्तम होस्ट देखील आहे. 'अबीर गुलाल' या मालिकेत अक्षय केळकरने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसेच तो नुकताच 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Akshay Kelkar Wedding VIDEO
Gautami Patil Video : 'फायर ब्रिगेडला बोलवा...'; गौतमी पाटीलचं जबरदस्त आयटम साँग, कातिल अदा पाहून चाहते फिदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com