Aamir Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aamir Khan : आमिर खानच्या ड्रीम प्रोजेक्टसंदर्भात मोठी अपडेट, चित्रपटाचे नाव काय?

Aamir Khan Dream Project : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. नुकतेच त्याने आपल्या ड्रीम प्रोजेक्टची मोठी अपडेट शेअर केली आहे.

Shreya Maskar

'द परफेक्शनिस्ट' आमिर खान (Aamir Khan) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अलिकडेच तो आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्याने आपल्या वाढदिवसाला गर्लफ्रेंडची ओळख चाहत्यांना करून दिली होती. आमिर खान यांनी आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्याच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. चाहते आता आमिरच्या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अशात आता आमिर खान एका मोठ्या प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. याचा खुलासा एका मिडिया मुलाखतीत आमिर खानने केला आहे. आमिर खानने मुलाखतीत सांगितले की, "मी आता लवकरच 'महाभारत' चित्रपटाचं काम सुरू करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मी करणार आहे. "

'महाभारत' (Mahabharat Movie ) चित्रपटाबाबत अधिक बोलताना आमिर खान म्हणाला, "'महाभारत' चित्रपटाचे 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' या हॉलिवूड सीरिजप्रमाणे अनेक भाग बनविण्यात येतील. मात्र या चित्रपटाचे लिखाण करण्याच खूप वेळ लागणार आहे. चित्रपटात मी कोणती भूमिका करेन की नाही हे मला आता माहित नाही. कारण याची पूर्ण जबाबदारी कास्टिंग टीमची असेल. ते भूमिकांसाठी योग्य निवड करतील"

पुढे 'महाभारत'चित्रपटाच्या भागांविषयी सांगताना आमिर खान म्हणाला की, "'महाभारत' एका भागातून सांगण्यासारखी गोष्ट नाही. त्यामुळे चित्रपटाचे काही भाग करण्याचा विचार आम्ही करत आहोत. यात मी इतर दिग्दर्शकांचा सल्ला देखील घेणार आहे."

'महाभारत' हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही आहे. मात्र आमिर खानचे चाहते चित्रपटासाठी उत्सुक आहेत. आमिर खान आता 'सितारे जमीन पर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 25 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT