Arun Singh Rana Divorced
Arun Singh RanaSAAM TV

Arun Singh Rana: 'महाभारत' फेम अरुण सिंह राणाने घेतला ४ वर्षांनी घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाला...

Arun Singh Rana Divorced: टीव्ही अभिनेता अरुण सिंह राणाने लग्नाच्या चार वर्षानंतर घटस्फोट घेतला आहे. या संबंधित सोशल मिडियावर त्याने पोस्ट शेअर केली आहे. घटस्फोटाचे नेमकं कारण जाणून घ्या.
Published on

टीव्ही अभिनेता अरुण सिंह राणाने (Arun Singh Rana) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या अरुण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अरुण सिंह राणाने लग्नाच्या 4 वर्षानंतर घटस्फोट घेतला आहे. त्याने यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अरुण सिंह राणाने 2013 मध्ये सौरभ राज जैनच्या 'महाभारत' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. यानंतर तो 'दिया और बाती हम'मध्येही दिसला होता. अभिनेता अरुण सिंह राणा 'नागिन 6' नंतर त्याच्या वैवाहिक जीवनात अडकला. अरुण सिंह राणा आपल्या घटस्फोट अनुभव सांगताना अतुल सुभाष यांचाही उल्लेख केला आणि ते त्यांच्या परिस्थितीशी सहज जुळवून घेऊ शकतात असे सांगितले.

अरुण सिंह राणाने 2018 मध्ये हिमाचलमध्ये शिवानीशी लग्न केले. एका मिडिया मुलाखतीत त्याने सांगितले की, "डिसेंबर 2024 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आहे. तो खूप काळ मानसिक तणावातून गेला होता पण कुटुंबाच्या पाठिंब्याने तो बाहेर आला. रिलेशनशिप तुटल्यानंतर मी कठीण प्रसंगांचा सामना केला"

घटस्फोटाचे नेमकं कारण काय?

अरुण पुढे म्हणाला की, "परिस्थितीचा सामना करताना अनेकवेळा जीवन संपवण्याचा विचार येतो आणि तुम्हाला कोणतीही आशा दिसत नाही. तेव्हा कधीही हार मानू नये कारण अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळचा प्रकाश नेहमीच असतो. जीवन ही देवाने दिलेली देणगी आहे. ज्याचा आदर केला पाहिजे. एखाद्यावर प्रेम केले पाहिजे आणि चांगल्या कर्माने जगले पाहिजे."

शेवटी अरुण म्हणाला, "मी बरा होत आहे. कुटुंब मला साथ देत आहे. मी माझ्या बहिणीचा आणि पालकांचा खूप आभारी आहे. 2025 मध्ये मला करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे मी माझ्या आयुष्यातील चार वर्षे गमावली. मला प्रेक्षकांचे पुन्हा प्रेम मिळावायचे आहे. चांगल्या भूमिका करण्यासाठी मी उत्सुक आहे"

Arun Singh Rana Divorced
Game Changer OTT Release: ॲक्शन-ड्रामा अन् रोमान्सचा धमाका घरबसल्या अनुभवा, राम चरणचा 'गेम चेंजर' ओटीटीवर येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com