Akshay Kumar instagram @akshaykumar
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Fan: अक्षय कुमारच्या बॉडीगार्डने दिला चाहत्याला धक्का; अभिनेत्याने धावून जात फॅनलाच...

अक्षय कुमारला भेटण्यासाठी एका चाहत्याने बॅरिकेडवरून उडी मारली.

Saam Tv

Akshay Kumar In Pune: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच व्यस्त असतो. त्याचे एका मागून एक प्रोजेक्ट येतच असतात. त्यामुळे द कपिल शर्मा शोमध्ये त्याच्या पैशांवर नेहमीच विनोद केला जातो. सध्या अक्षय कुमार त्याच्या आगामी 'सेल्फी' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

'सेल्फी' चित्रपटात अक्षय कुमारसोबत इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय नुकताच पुण्यात गेला होता. जिथे अक्षय पाहण्यासाठी हजारो चाहत्यांची झुंबड उडाली होती. यादरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की अक्षय कुमारच्या सुरक्षेसाठी अनेक अंगरक्षक आहेत. तसेच बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मात्र, अक्षय कुमारला भेटण्यासाठी एका चाहत्याने बॅरिकेडवरून उडी मारून अक्षयच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला अक्षय कुमार चाहत्यांशी हात मिळवत पुढे जाताना दिसत आहे. इतक्यात अक्षयचा एक चाहता बॅरिकेडवरून उडी मारून त्याला भेटण्याचा प्रयत्न करतो. मात्र अक्षय कुमारचे बॉडीगार्ड त्याला थांबवत असतात. दरम्यान त्याला खाली ढकलले जाते.

अक्षयचा बॉडीगार्डच्या चाहत्याला थांबविण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु बॉडीगार्डच्या हाताला चाहता न लागल्याने त्याला धक्का लागतो आणि धक्क्यामुळे चाहता जमिनीवर पडतो. मागे उभा असलेला अक्षय कुमार सगळयांना थांबवतो आणि पुढे येतं त्याच्या चाहत्याला मिठी मारतो.

अक्षयचा हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर सर्वत्र व्हायरल होत आहे. अक्षयचे चाहते त्याच्या वागण्याचं कौतुक करत आहेत. प्रत्येक अभिनेता असा असला पाहिजे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी दोघेही 'सेल्फी' चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर इमरान हाश्मीही बऱ्याच दिवसांनी चित्रपटात दिसणार आहे. या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

'सेल्फी' चित्रपटाची गाणीही एकापाठोपाठ एक प्रदर्शित होत आहेत. अक्षय आणि इमरानचा हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळे तालुका पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद

माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, समर्थकांचा मोठ्या संख्येने कोर्टाबाहेर जमाव|VIDEO

सगळ्यांना खदखदून हसवणारी कॉमेडी क्वीन दुसऱ्यांना झाली आई; शुटिंगला जाताना आल्या प्रसृती कळा

Phone Scam: मोबाइल फोन सारखा ट्रिंग ट्रिंग करतोय, मोठा फ्रॉड होण्याचा धोका, हे 5 संकेत आधीच ओळखा

Dhurandhar Cast Net Worth: रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त, जाणून घ्या कोणता धुरंधर आहे सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT