Naseeruddin Shah: नसरुद्दीन शाहांनी रचला इतिहास; छत्रपती शिवाजी महाराजानंतर आता दिसणार 'या' भूमिकेत

'भारत एक खोज' या दूरदर्शनवरील मालिकेत नसरुद्दीन शाह यांनी महाराजांची भूमिका साकारली होती.
Naseeruddin Shah In Different historical role
Naseeruddin Shah In Different historical role Twitter @FilmHistoryPic
Published On

Naseeruddin Shah Role In Bharta Ek Khoj: सिनेसृष्टीत अनेक ऐतिहासिक कलाकृती बनविण्यात आल्या आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांवर बनविण्यात आलेली कलाकृती ही नेहमीच कलाकारांसाठी खास असते. अनेक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर अनेक कलाकारांना त्याची जबाबदारी तो चित्रपट किंवा नाटक संपल्यानंतरही सांभाळावी लागते. कारण महाराजांची भूमिका साकारल्यानंतर त्या कलाकाराला सामाजिक भान देखील बाळगावे लागते.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकार नसरुद्दीन शाह यांना महाराजांची भूमिका साकारण्याचे सौभाग्य मिळाले होते. नसरुद्दीन शाह यांनी अनेक दशके चित्रपटांमध्ये तसेच रंगभूमीवर काम केले आहे.

Naseeruddin Shah In Different historical role
Tamil Comedian Mayilsamy Dies: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकमुळे निधन

'भारत एक खोज' या दूरदर्शनवरील मालिकेत नसरुद्दीन शाह यांनी महाराजांची भूमिका साकारली होती. १९८९ साली ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित व्हायची. भारतीय संस्कृतीचा सामाजिक, भौगोलिक आढावा या मालिकेतून पाहायला मिळाला. श्याम बेनेगल यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते.

'भारत एक खोज ' या मालिकेतील ३७ आणि ३८ व्या भागात शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा आढावा घेण्यात आला होता. शिवाजी महाराजांसह राजमाता जिजाऊ, दादाजी कोंडदेव अशी ऐतिहासिक पात्र या मालिकेत दाखविण्यात आली होती. नसरुद्दीन शाह यांनी या भागात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती.

नसरुद्दीन शाह एक उत्तम कलाकार आहेत. त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाही तितक्याच जबाबदारीने साकारली होती. महाराजांचा रुबाब, ऐट, दरारा नसरुद्दीन शाह यांनी प्रभावीपणे साकारला होता.

या मालिकेत औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांचा संघर्ष दाखविण्यात आला होता. तसेच शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजल खानच्या वधाचा प्रसंग या मालिकेत दाखविण्यात आला आहे.

फिल्म हिस्टरी पिक्स या पेजवर 'भारत एक खोज' या मालिकेतील शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा एक फोटो शेअर करण्यात आला होता. ५३ भागांची ही मालिका होती. यामध्ये चाणक्य, चंद्रगुप्तपासून शिवाजी महाराज, विवेकानंद महात्मा गांधींपर्यंत अनेक दिग्गजयांच्या कथा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या होत्या.

शिवाजी महाराजांच्या भूमिकेत नसरुद्दीन शाह तर औरंगजेबाच्या भूमिकेत ओम पुरी होते. नसरुद्दीन शाह जानेवारी २०२३ला प्रदर्शित झालेल्या 'कुत्ते' चित्रपटामध्ये दिसले होते. तर 'ताज' या वेबसीरीज अकबर बादशाहची भूमिका साकारणार आहेत.

३ मार्चला हा वेबसीरीज झी ५ वर प्रसारित होणार आहे. या वेबसीरीजमध्ये नसरुद्दीन शाहसह अभिनेता सुबोध भावे आणि धमेंद्र देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com