Vijay Sethupathi Jawan's New Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Vijay Sethupathi Jawaan Look: ‘मौत के सौदागर’ जवानमधल्या व्हिलनचा थक्क करणारा लूक आला समोर; शाहरुख विरुद्ध सेथुपती सामना रंगणार

Vijay Sethupathi Dashing Look: जवान मधील विजय सेतुपतीचा लूक समोर आला आहे.

Chetan Bodke

Vijay Sethupathi Jawan's New Poster: बॉलिवूडचा किंग खान सध्या ‘जवान’मुळे बराच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून चित्रपटाची उत्सुकता कमालीची शिगेला पोहोचलीय. ‘पठान’ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘जवान’ला किती यश मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपट येत्या सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होत असून नुकताच चित्रपटातील विजय सेतुपतीचा लूक समोर आला आहे. सध्या विजयच्याही लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच विजय सेतुपती आणि किंग खान रूपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीचा चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांची आता चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची शिगेला पोहोचली आहे.

विजय सेतुपतीसोबतच किंग खाननेही चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. जवानमध्ये खलनायकाच्या भूमिकेत असलेल्या विजय सेतूपतीची सध्या तुफान चर्चा होत आहे. विजयने यापूर्वीही बॉलिवूडमध्ये त्याने काम केले आहे. नुकताच शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ वेबसीरिजमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली.

चित्रपटाला वाढता प्रतिसाद पाहता दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर केला आहे. विजयने या पोस्टरमध्ये खलनायकाची भूमिका साकारली असून शेअर केलेल्या पोस्टला निर्मात्यांनी ‘मौत के सौदागर’ अशी ओळख करून दिली. विजयच्या या एका झलकने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

‘जवान’मध्ये विजय सेतुपतीची एन्ट्री झाल्यामुळे हा चित्रपट कमालीचा चर्चेत आहे. टॉलीवूडचा सुपस्टार म्हणून त्याची ओळख असलेला विजय त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. विजय सेतुपतीची एन्ट्री चित्रपटाला आणखी वेगळया उंचीवर नेणारी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

First car service: नवी कार घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे?

'70 पैकी 35 टक्केच जंगल शिल्लक' कर्जतमधील वृक्षतोडीवर सयाजी शिंदे संतापले|VIDEO

Sweet Bor Recipe : दिवाळीचा फराळ होईल खास! बनवा कोकण स्पेशल खुसखुशीत गोड बोरं, खूपच सोपी आहे रेसिपी

Maharashtra News Live Update: भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईवर आढावा बैठक सुरू

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

SCROLL FOR NEXT