Sohail Khan saamtv
मनोरंजन बातम्या

Sohail khan: पहिल्याच भेटीत सोहेल पडला फॅशन डिझायनरच्या प्रेमात, हटक्या पद्धतींने केले लग्न

सलमान खान, सोहेल खान आणि अरबाज खान हे तीन्ही भाऊ बॉलिवूडमध्ये 'खान ब्रदर्स' म्हणून ओळखले जातात.

Chetan Bodke

Soheil Khan: सलमान खान, सोहेल खान आणि अरबाज खान हे तीन्ही भाऊ बॉलिवूडमध्ये 'खान ब्रदर्स' म्हणून ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये भाईजानची चर्चा तर होतेच त्याचबरोबर सर्वात लहान असलेल्या सोहेल खानच्याही अभिनयाची आणि कामाचीही नेहमीच चर्चा होते. ९० च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने लोकप्रियता मिळणाऱ्या सोहेल खानचा आज (२०, डिसेंबर) ५२ वा वाढदिवस आहे.

सोहेलनेही बॉलिवूडमध्ये अभिनय करण्याऐवजी दिग्दर्शक आणि निर्माता बनण्याचा विचार केला. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'औजार' या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते. यात सलमान खान, संजय कपूर आणि शिल्पा शेट्टी प्रमुख भूमिकेत होते. त्यानंतर त्याने 'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सोहेलने 2002 मध्ये लिहिलेल्या 'मैंने दिल तुझको दिया' या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले. चित्रपटात त्याच्यासोबत समीरा रेड्डी ही मुख्य भूमिकेत होती.

'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सोहेलची सीमा सचदेवशी भेट झाली. सीमा मूळची दिल्लीची आहे पण फॅशन डिझाईनिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईत आली होती. सोहेल आणि सीमा हे दोघेही एकमेकांना पहिल्या भेटीपासूनच डेट करत होते.

दोघांनाही लवकरात लवकर लग्न करायचे होते, पण सीमाचे कुटुंबीय लग्नासाठी अजिबात तयार नव्हते. म्हणून दोघांनीही पळून जाऊन आर्य समाज मंदिरात लग्नगाठ बांधली. यानंतर इस्लाम पद्धतीने लग्न करण्यासाठी दोघांनीही मध्यरात्री मौलवींना पळवून आणत लग्न केले होते. पण त्यानंतर सर्व काही मान्य करण्यात आले.

सोहेल आणि सलमान हे दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. मैने प्यार क्यूं किया, सलाम-ए-इश्क: अ ट्रिब्यूट टू लव्ह, गॉड तुस्सी ग्रेट हो, वीर आणि ट्यूबलाइट सोहेल- सलमानचे हे पाच चित्रपट आहेत.

तथापि, मैने प्यार क्यों किया? हा चित्रपट सोडला तर सोहेलचे हे सर्व चित्रपट खास कमाई करु शकले नव्हते. सोहेलने तीन वर्षाच्या गॅपनंतर सलमान खानचे प्रॉडक्शन हाऊस राधे मधून त्याने पुन्हा एकदा पदार्पण केले. नवाजुद्दीनचा 'फ्रीकी अली' हा चित्रपट त्याचा सुपरफ्लॉप ठरला होता.

सोहेलचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे जे त्याची पत्नी चालवते.सीमा सचदेव ही सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. 'जस्सी जैसी कोई नहीं' या टीव्ही मालिकेतील कलाकारांसाठीचे कपडे सीमाने डिझाइन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT