Blocbaster Movies canva
मनोरंजन बातम्या

Blocbaster Movies 2024: साउथच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवला; मल्याळम चित्रपटानं दिली बॉलिवूडला टक्कर

Sejal Purwar

अनेक कलाकारांना आणि चित्रपटांना 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवल्याचे आपण पाहिले आहे. प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ने 1100 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. त्याच वेळी, राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' ने बॉक्स ऑफिसवर 600 कोटींचा आकडा पार केला आहे. पण आज आम्ही तुम्हाला 2024 च्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाविषयी सांगणार आहोत.

हे वर्ष मल्याळम चित्रपटांसाठी सुवर्णकाळ ठरले आहे. अनेक चित्रपटांचे प्रेक्षकांनी तोंडभरून कौतुक केले आहे. 'मंजुम्मेल बॉईज' ते 'आवेशम' सारख्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दरम्यान, मल्याळम चित्रपट 'प्रेमालु' प्रदर्शित झाला, ज्याने त्याच्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई करून निर्मात्यांना श्रीमंत केले. विशेष म्हणजे अगदी कमी बजेटमध्ये बनलेला 'प्रेमालू' 2024 सालातील सर्वाधिक नफा कमावणारा चित्रपट ठरला आहे.

'प्रेमालू' चित्रपटात एकही मोठा स्टार नव्हता. निर्मात्यांनी नवोदित कलाकारांना कास्ट करून हा चित्रपट बनवला होता. नसलेन, ममिता बैजू आणि श्याम मोहन यांसारख्या स्टार्सनी या चित्रपटात काम केले. विशेष म्हणजे हा चित्रपट अत्यंत कमी बजेटमध्ये बनवण्यात आला होता. 'प्रेमालू' या रोमँटिक-ड्रामा चित्रपटासाठी केवळ 3 कोटी रुपये खर्च आला होता. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व मिळवले. 'प्रेमालू'ने जगभरात 136 कोटींची कमाई करून इतिहास रचला.

'प्रेमालू'ने बॉक्स ऑफिसवर निर्मात्यांना खर्चापेक्षा 4500 पट अधिकचा नफा दिला. 2024 मध्ये कोणत्याही चित्रपटाने त्याच्या खर्चाच्या तुलनेत इतकी कमाई केलेली नाही. मग ते 'कल्की 2898 AD'असो किंवा 'स्त्री 2'.

प्रभासचा 'कल्की 2898 एडी' हा 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे, जो 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटाचा नफा 100 टक्क्यांहून कमी झाला आहे. त्याच वेळी, 'स्त्री 2' अंदाजे 60 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने निर्मात्यांना अंदाजे 850 टक्के नफा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT