Ravi kishan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ravi kishan: खासदार रवी किशन यांची ३ कोटींची फसवणूक, बिल्डरवर गुन्हा दाखल

गोरखपूरच्या कँट पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Shivani Tichkule

Ravi Kishan Latest News: गोरखपूरमधील भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) यांच्यासोबत तीन कोटींची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. गोरखपूरच्या कँट पोलीस (Police) ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

भाजप खासदार रवी किशन यांनी कँट पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. एका बिल्डरने आपली ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. बिल्डरवर आयपीसी कलम 406 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, रवी किशन यांनी 2012 मध्ये पूर्व मुंबईतील रहिवासी जैन जितेंद्र रमेश नावाच्या व्यक्तीला 3.25 कोटी दिले होते. पैसे परत करण्यास सांगितले तेव्हा त्याने 34 लाख लाखांचे 12 चेक दिले. खासदार रवी किशन यांनी 7 डिसेंबर 2021 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गोरखपूर शाखेत चेक जमा केला तेव्हा चेक बाऊन्स झाला.

कँट पोलीस स्टेशनचे प्रभारी शशी भूषण राय यांनी सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पूर्वी खासदार कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंघारिया येथे राहत होते, परंतु अलीकडे ते तारांगण लेक व्ह्यू कॉलनी येथील घरात राहू लागले आहेत. नुकतेच रवी किशन यांनी आपल्या कौटुंबिक समस्येबद्दल ट्विट केले होते.त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या आईला कॅन्सर झाला असून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मोठ्या भावाचेही आजारपणामुळे निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही, कारण आलं समोर

राज्यात मोठी घडामोड! भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे; पत्रावर घेतली स्वाक्षरी? नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा निर्णय झाला का? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update: अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्वं

Monday Horoscope: कामाचा ताण वाढेल, 5 राशी होणार मालामाल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT