Kangana Ranaut Demand Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Demand : मतदारसंघातील लोकांसाठी कंगना रणौतचा नवा नियम, कंगनाच्या नव्या फतव्यानं काँग्रेससह नेटकरीही संतापले...

Kangana Ranaut News : सध्या कंगना रणौत तिच्या एका अजब फतव्यावरुन चर्चेत आली आहे. आणि त्यावरुन लोकांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. एवढंच नाही, तर काँग्रेसनंही कंगना रणौतवर निशाणा साधला आहे.

Mohini Sonar

लोकसभेतील विजयानंतर आता कंगना रणौत बऱ्याच गोष्टींवरुन चर्चेत असते. कधी एखाद्या महिला पोलिस अधिकाऱ्यानं कानशिलात लगावल्यावरुन तर कधी अजब गजब वक्तव्यांवरुन. तर कधी तिचा अभ्यास किती कमी आहे, यावरुनही तिला ट्रोल केलं जातं. पण सध्या कंगना रणौत तिच्या एका अजब फतव्यावरुन चर्चेत आली आहे. आणि त्यावरुन लोकांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. एवढंच नाही, तर काँग्रेसनंही कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. दरम्यान काय आहे या सगळ्याचं कारण जाणून घेऊया.

काय आहे प्रकरण?

खासदार कंगना रणौत झाल्यापासून बरेच लोक तिला भेटायला येत असतात. कंगना रणौत हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातून भाजपकडून लोकसभेत निवडून आली आहे. विशेष म्हणजे ती सेलिब्रिटी आहे, त्यामुळे अनेकांना तिला भेटण्याची इच्छा असते. तर अनेक लोक स्वतःची कामं घेऊन तिच्याकडे येत असतात. पण या सगळ्या लोकांना भेटण्यासाठी कंगनानं एक नियम घालून दिलेला आहे.

तो नियम असा की, ज्याला कुणाला तिला भेटायचं असेल, त्यानं स्वतःचं आधारकार्ड सोबत आणावं, एवढंच नाही, तर आपलं काम काय आहे, यासंदर्भातलं एक पत्रही सोबत आणावं. असा नियम आहे. आता हा नियम यासाठी की, हिमाचल प्रदेशात बरेच पर्यटक येत असतात. तिच्या कार्यालयात मोठ्या संख्येने पर्यटक आणि बाहेरील लोक येत असल्यानं, सुरक्षेच्या कारणामुळे हा नियम लागू करत असल्याचं कंगना रणौतने स्पष्ट केलंय. मात्र यावरुन आता तिला ट्रोल केलं जातंय. या नियमाविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच या नियमावरुन काँग्रेसनंही कंगना रणौतवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचा कंगनावर घणाघात

यावरुन लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंग यांनी तिच्यावर टीका केली आहे.ते म्हणाले, लोकप्रतिनिधीला कुणीही भेटू शकतो. आणि सर्वांच्या समस्या दूर करणं ही प्रत्य़ेकाची जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

लहान-मोठे काम असो, की, मग राजकीय बाबी असोत अथवा वैयक्तिक समस्या असो, समाजातील सर्व लोकांना भेटणं ही त्यांची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लोकांना भेटायचे असेल तर त्यांना आधार कार्डसारखी ओळख देण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी कंगनावर टीका केली आहे. याशिवाय सोशल मिडियावरही तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. सगळ्या नेटकऱ्यांनी टीकेच्या कमेंट्सचा तिच्यावर भडीमार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT