आज (11 ऑक्टोबर)ला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे.
अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये लग्जरी प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
अलिबागमध्ये अमिताभ बच्चन यांनी 3 प्लॉट कोटींच्या किंमतीत विकत घेतले आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज (11 ऑक्टोबर) ला वाढदिवस आहे. आज बिग बी 83 वर्षांचे झाले आहे. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचे आणि स्टाइलचे लाखो चाहते दिवाने आहेत. अमिताभ बच्चन कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या ते आपल्या प्रॉपर्टी गुंतवणुकीमुळे चर्चेत आले आहे. त्यांनी नुकतीच आलिशान प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी मुंबईजवळील अलिबागमध्ये तीन आलिशान प्लॉट खरेदी केली आहे. ज्याची किंमत सुमारे 6.6 कोटी रुपये आहे. अमिताभ बच्चन यांनी लेक अभिषेक बच्चनसोबत मिळून ही मालमत्ता खरेदी केली आहे. अलिबागमधील त्यांच्या गुंतवणूकीची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात मुनवली गावात तीन प्लॉट खरेदी केले आहेत. या तिन्ही प्लॉटची मिळून किंमत तब्ब्ल 6.59 कोटी रुपये आहे.
कागदपत्रांनुसार, हे तिन्ही प्लॉट 7 ऑक्टोबर 2025 मध्ये नोंदणीकृत करण्यात आले. तिन्ही प्लॉट मिळून 9,557 चौरस फूट आकाराचे आहेत. प्लॉट्सचा नंबर 96, 97 आणि 98 असे आहे. मुंबईपासून सहज जलमार्ग जोडला जात असल्यामुळे सेलिब्रिटी येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. अमिताभ बच्चन यांचे मुंबईत 'जलसा', 'प्रतीक्षा' आणि 'जनक' हे तीन बंगले आहेत. अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी अयोध्येतही कोट्यावधींची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 1,630 कोटी रुपयांच्या वर आहे. अमिताभ बच्चन सिनेमासोबत जाहिराती, कोण बनेगा करोडपतीचे होस्टिंग देखील करतात. तसेच ते प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक देखील करतात. अमिताभ बच्चन यांनी 'कल्की 2898'साठी तब्बल 20 कोटी रुपये मानधन घेतले होते. तर कौन बनेगा करोडपती (केबीसी) च्या एका एपिसोडसाठी ते 5 कोटी रुपये फी घेतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.