Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

Dhanshri Shintre

विविध रिचार्ज प्लॅन

जिओकडून सध्या विविध रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. कंपनीने काही प्लॅनसोबत फेस्टिव्ह ऑफर्स दिल्या असून त्यापैकी एक खास प्लॅन ३४९ रुपयांचा आहे.

फायदे

या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा आणि एसएमएससोबतच अतिरिक्त बेनिफिट्स दिले आहेत. सर्व प्रीपेड ग्राहकांना हा ऑफर घेण्याची संधी उपलब्ध आहे.

किती दिवसांसाठी वैधता

जिओचा ३४९ रुपयांचा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध आहे. यात दररोज २ जीबी डेटा मिळतो, म्हणजे एकूण ५६ जीबी डेटाचा लाभ मिळतो.

ओटीटी सबस्क्रिप्शन

या ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ टीव्ही तसेच जिओ एआय क्लाउड सेवांचा मोफत अॅक्सेस दिला जातो.

जिओ फायनान्स

जिओच्या स्पेशल ऑफरनुसार, जिओफायनान्सद्वारे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २ टक्के अतिरिक्त जिओ गोल्डचा लाभ दिला जात आहे.

जिओ होम

या ऑफरअंतर्गत नवीन ग्राहकांना जिओ होमची दोन महिन्यांची मोफत ट्रायल मिळणार आहे. मात्र, विद्यमान यूजर्सना या लाभाचा फायदा मिळणार नाही.

JioHotstar

या रिचार्ज प्लॅनसोबत JioHotstar चे तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते, जे मोबाइल आणि टीव्ही या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

5G डेटाचा लाभ

या जिओ प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित 5G डेटाचा लाभ मिळतो. मात्र, यासाठी 5G स्मार्टफोन आणि जिओचे 5G नेटवर्क असणे आवश्यक आहे.

विशेष ऑफर

या प्लॅनमध्ये नियमित सुविधा दिल्या असल्या, तरी जिओची विशेष ऑफर या प्लॅनला इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक आकर्षक बनवते.

NEXT: दिवसांसाठी जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन; कॉलिंग, मेसेजिंग अन् बरंच काही, किंमत किती?

येथे क्लिक करा