Madhuri Dixit : माधुरीच्या त्याच अदा अन् तीच नजर; भन्नाट डान्स पाहून चाहते झाले घायाळ -VIDEO

Madhuri Dixit Dance video : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने भन्नाट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्साचा वर्षाव होत आहे.
Madhuri Dixit Dance video
Madhuri DixitSAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने इन्स्टाग्राम डान्स रील शेअर केली आहे.

माधुरी दीक्षितला बॉलिवूडमध्ये धकधक गर्ल या नावाने ओळखले जाते

माधुरीने किशोर कुमार, आशा भोसले यांच्या जुन्या गाण्यावर डान्स केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपले सुंदर फोटो आणि डान्स रील कायम शेअर करते. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती एका जुन्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

माधुरी दीक्षित यांनी किशोर कुमार, आशा भोसले यांच्या 'इंताहा हो गई इंतेजार की'(Intaha Ho Gai Intezar Ki) या गाण्यावर डान्स केला आहे. हे गाणे 1984 मध्ये रिलीज झालेल्या 'शराबी' (Sharaabi ) चित्रपटातील आहे. माधुरी दीक्षितने व्हिडीओला खूप हटके कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की," A little 80s charm, a whole lot of 2025 glam" माधुरी दीक्षितच्या या डान्स व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा, कौतुकाचा वर्षाव होत आहे.

माधुरी दीक्षितने ही डान्स रील घरी शूट केली आहे. ज्यामुळे तिच्या सुंदर घराची एक झलक देखील व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हिडीओत माधुरी संपूर्ण घरभर फिरताना दिसत आहे. तिच्या घरात सुंदर पेंटिंग पाहायला मिळत आहे. माधुरीने ऑफ व्हाइट रंगाचा पंजाबी स्टाइल सूट परिधान केला आहे. मोकळे केस, मॅचिंग ज्वेलरी आणि मिनिमल मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.

माधुरी दीक्षित कायम भन्नाट रीलचे व्हिडीओ शेअर करत असते. याआधी तिने माधुरी दीक्षित आणि त्यांच्या मैत्रिणी 'कहीं आग लगे लग जावे' गाण्याच्या हुक स्टेपवर भन्नाट थिरकले होते. व्हिडीओमध्ये माधुरी गॉगल लावून स्वॅगमध्ये डान्स करताना दिसल्या. 1999 साली रिलीज झालेल्या 'ताल' चित्रपटातील हे गाणे आहे. चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

Madhuri Dixit Dance video
Nandish Sandhu : लोकप्रिय अभिनेता दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात; गुपचूप साखरपुडा उरकला, पाहा PHOTOS

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com