Shreya Maskar
धकधक गर्ल 58 व्या वर्षी देखील तरुणाईला आपल्या स्टाइल आणि लूकने घायाळ करत आहे.
माधुरी दीक्षितने काळ्या रंगाची सुंदर फ्लोरल प्रिंटेड साडी नेसली आहे. जी गाऊन टाइप दिसते.
सिल्व्हर कानातले आणि बोटात सिल्व्हर मोठ्या अंगठ्या तिने घातल्या आहेत.
साडीवरील नक्षीकाम खूपच सुंदर दिसत आहे. माधुरी दीक्षितला एक रॉयल लूक मिळाला आहे.
मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअपमध्ये माधुरी अप्सरापेक्षा कमी दिसत नाही.
माधुरी दीक्षितच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
माधुरीची स्माइल पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिने साडीमध्ये हटके फोटोशूट केले आहे.
अलिकडेच माधुरी दीक्षित 'भूल भुलैया 3' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.