Shreya Maskar
अक्षय कुमार आणि अर्शद वारसीचा 'जॉली एलएलबी 3' कोर्टरूम कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे.
'जॉली एलएलबी 3' चित्रपट 19 सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे.
'जॉली एलएलबी 3' हा जॉली एलएलबी फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे.
'जॉली एलएलबी 3'मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसीसोबत सौरभ शुक्ला,अमृता राव आणि हुमा कुरेशी हे कलाकार देखील झळकले आहेत.
'जॉली एलएलबी ' 2013 मध्ये आणि 'जॉली एलएलबी 2 ' चित्रपट 2017 ला रिलीज झाला.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'जॉली एलएलबी 3' ने पहिल्या दिवशी 12.50 कोटी रुपये कमावले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'जॉली एलएलबी 3' चित्रपट थिएटर रिलीजनंतर जिओहॉटस्टार आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
थिएटर रिलीजच्या 60 दिवसांनी नोव्हेंबरला चित्रपट ओटीटीवर येणार. 14 नोव्हेंबर 2025 या तारखेची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.