Shreya Maskar
कल्याणच्या चुलबुली शिवाली परबने पारंपरिक लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
शिवाली परबने केशरी-पीच रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
हातात बांगड्या, गळ्यात गोल्डन हार , मोत्यांचे कानातले आणि मिनिमल मेकअप करून तिने लूक पूर्ण केला आहे.
मोकळ्या केसांत गजरा माळून पोज करताना शिवाली व्हिडीओत दिसत आहे.
शिवालीच्या चेहर्यावरचे हास्य पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.
नाकात नथ आणि कपाळावर छोटी चंद्रकोर लावून शिवालीने मराठमोळा साज श्रृंगार केला आहे.
"नजरेचा नखरा आणि नथीचा तोरा..." असे हटके कॅप्शन शिवालीने व्हिडीओला दिले आहे.
शिवाली परबच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करत आहे.