'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT 2) चा विनर एल्विश यादव (Elvish Yadav) या नाही तर त्या कारणांमुळे चर्चेत अशतो. या शोचा विजेता झाल्यापासून त्याचे नाव कोणत्या ना कोणत्या वादात येत आहे. नोएडातील एका पार्टीत सापाच्या विषाच्या तस्करीचे प्रकरण असो किंवा वैष्णोदेवी मंदिरात जाण्यावरून झालेली मारहाणीचे प्रकरण असो एल्विश रोजच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत येताना दिसतो. आता यूट्यूबर सागर ठाकूरला (Sagar Thakur) केलेल्या मारहाणीच्या प्रकरणामुळे एल्विश यादव चर्चेत आला आहे. हे प्रकरणामुळे एल्विश यादवच्या अडचणीत वाढ झाली आहे.
एल्विश यादववर सागरला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये एल्विश यादव हा सागर ठाकूरला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करताना दिसत आहे. या प्रकरणानंतर गुरुग्रामच्या सेक्टर 53 पोलिस ठाण्यात एल्विशविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आता 12 मार्च रोजी पोलिसांनी एल्विश यादवला चौकशीसाठी बोलावले आहे. सध्या 'Elvish vs Maxtern' आणि 'Arest Elvish Yadav' सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. यासोबतच लोकांना हे देखील जाणून घ्यायचे आहे की मॅक्सटर्न उर्फ सागर ठाकूर कोण आहे. ज्याच्याशी एल्विशचा हा वाद झाला आहे.
मॅक्सटर्न उर्फ सागर ठाकूर हा देखील YouTuber आहे. तो गेमिंगशी संबंधित व्हिडिओ बनवतो. त्याचे YouTube वर अंदाजे 1.6 मिलियन युजर्स आणि इन्स्टाग्रामवर 30 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो आयआयटीचे वेगवेगळे व्हिडिओ तयार करूने ते तत्सम लोकांसोबत शेअर करतो. सागरने सांगितले की, तो एल्विशला 2021 पासून ओळखतो. एल्विश 'बिग बॉस OTT 2' मध्ये गेल्यापासून दोघांमध्ये शब्दयुद्ध सुरू आहे. मात्र, हे केवळ सोशल मीडियापुरतेच मर्यादित होते.
एल्विश यादवने नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये त्याने आपली बाजू मांडली आहे. बिग बॉसमध्ये असताना सागरने अशा काही कमेंट केल्या होत्या. ज्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले होते. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. 'बिग बॉस ओटीटी 2'चा विनर मुनव्वर फारुकीसोबत दिसल्यानंतर एल्विश आणि सागर यांच्यातील वाद सुरू झाला. क्रिकेटच्या मैदानावरून दोघांचे काही फोटो समोर आले आहेत. हा फोटो रिपोस्ट करताना मॅक्सटर्नने एल्विशला खूप फटकारले होते. एल्विशही गप्प बसला नाही आणि त्याने सोशल मीडियावर मॅक्सटर्नला जोरदार प्रत्युत्तर दिले. एल्विश यादवने उत्तर दिले, 'भावा, तू दिल्लीत राहतो, वाटले तुम्हाला आठवण करून द्यावी.' जेव्हा हे प्रकरण वाढतच गेले तेव्हा दोघांनी एक मिटिंग निश्चित केली. याठिकाणी एकमेकांना भेटण्यासाठी आले असता एल्विशने मॅक्सटर्नला मारहाण केली. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.