DG Immortals On Elvish Yadav Saam TV
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav च्या पार्टीत खरंच सापांचे विष आणि परदेशी मुली असायच्या का?, मित्र DG Immortals ने सांगितलं सत्य

DG Immortals On Elvish Yadav: डीजी इमोर्टल्स (DG Immortals) म्हणजेच एल्विशचा मित्र आणि त्याच्यासोबत काम केलेला दिग्विजय मेहरा याने यामागचं सत्य सांगितले आहे.

Priya More

Bigg Boss OTT 2:

'बिग बॉस ओटीटी 2' चा (Bigg Boss OTT 2) विनर एल्विश यादव (Elvish Yadeav) सध्या चर्चेत आहे. एल्विश यादव सध्या एका प्रकरणामुळे अडचणीत आहे. एल्विशवर सापाच्या विषाची तस्करी आणि रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोपा करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली.

पोलिसांकडून एल्विश यादवची चौकशी सुरू आहे. पण खरंच एल्विशवर करण्यात आलेले आरोप खरे आहेत का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. डीजी इमोर्टल्स (DG Immortals) म्हणजेच एल्विशचा मित्र आणि त्याच्यासोबत काम केलेला दिग्विजय मेहरा याने यामागचं सत्य सांगितले आहे.

हरियाणाच्या म्युझिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा असलेल्या डीजी इमोर्टल्सने नुकताच 'आज तक'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये एल्विश यादवच्या पार्टीसोबतच वादावरही चर्चा केली. एल्विशशी त्याचं कसं नातं आहे तेही सांगितलं. डीजीने एल्विश यादवसोबत 'सिस्टम' आणि 'छोरा हरियाणा' यासारखी हिट हरियाणवी गाणीही गायली असल्याची माहिती आहे.

एल्विश यादवच्या पार्ट्यांमध्ये काय होतं? या प्रश्नाला उत्तर देताना डीजी इमोर्टल्सने सांगितले की, ज्यापद्धतीने सध्या पार्टींसंदर्भात बोलले जात आहे पण एल्विशच्या पार्टींमध्ये असे काही घडत नाही. मी एल्विशसोबत केलेली शेवटची पार्टी बँकॉकमध्ये झाली होती. ही पार्टी खूप शांत आणि अगदी सामान्य पद्धतीने झाली होती.' डीजीच्या म्हणण्यानुसार, 'पार्टीत आम्ही सर्वांनी खाऊन-पिऊन आपापल्या घरी गेलो. पण सध्या जसं सांगितलं जातंय की पार्टींमध्ये परदेशी मुली होत्या, कोणी साप आणले होते, कोणी ड्रग्ज आणले होते. तर हे सर्व खोटं आहे. असं काहीच व्हायचे नाही.'

डीजी पुढे म्हणाला की, ' सामान्य मुलं जशी पार्टी करतात तशीच आमची देखील पार्टी सामान्य असायची.' यावेळी डीजीने एल्विश यादवच्या सापासोबत असलेल्या फोटोमागचे सत्य देखील सांगितले. तो म्हणाला की, ' तो फोटो बँकॉकमधला असून तो व्हिडिओ शूटचा भाग आहे. पण लोकांनी ते काहीतरी वेगळं म्हणून दाखवलं आणि त्यातून मोठी गडबड केली. या शूटदरम्यान मी एल्विशसोबत बँकॉकमध्येही उपस्थित होतो.'

डीजीला एल्विश यादवच्या वादाबद्दल विचारले असता तो म्हणाला की, 'यापूर्वीही त्याच्यावर अनेक आरोप झाले आहेत. त्याच्यावर चोरीचा देखील आरोप झाला होता. डीजी पुढे म्हणाला की, एल्विशला हे सर्व करण्याची गरज नाही. तो खूप कमावतो आणि त्याला पैसा किंवा प्रसिद्धीची कमतरता नसते.'

डीजीने असं देखील सांगितलं की, 'जेव्हा मी एल्विश यादवला या वादाबद्दल विचारले आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारले तेव्हा त्याने हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले. त्याचसोबत त्याच्याबद्दल पसरलेल्या सर्व गोष्टी खोट्या असल्याचे सांगितले. त्याच्याबरोबर काहीना काही चालू असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT