Delhi News: हरियाणातील जातीय हिंसाचारावर (Haryana Clashes News) दिल्लीत विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या (Bajarang Dal) समर्थकांकडून आंदोलनं आणि निदर्शने सुरू आहेत. याचवरुन सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आंदोलन करणाऱ्यांना इशारा दिला आहे. त्याचसोबत अधिकाऱ्यांना कडक सुरक्षा तैनात करावी असे आदेश दिले आहेत.
हरियाणा हिंसाचारानंतर पुन्हा कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टाने अधिकाऱ्यांना कडक सुरक्षा आणि सीसीटीव्ही पाळत ठेवण्यास सांगितले आहे. या निदर्शनांदरम्यान हिंसाचार आणि द्वेषपूर्ण भाषण होणार नाही याची खात्री करण्यासाठी पावले उचलली जावीत, असे देखील कोर्टाने सांगितले आहे. निमलष्करी दलाच्या जवानांसह पुरेसा फौजफाटा तैनात करण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोर्टाने असे देखील सांगितले की, 'कोणतीही हिंसा आणि द्वेषयुक्त भाषण होणार नाही यासाठी अधिकाऱ्यांकडून योग्य ती कारवाई केली जाईल याची खात्री करावी.', असे कोर्टाने सांगितले आहे. तसंच, सीसीटीव्ही लावा जेणेकरून सर्व काही रेकॉर्ड करता येईल, असं देखील सांगण्यात आले आहे. दरम्यान, हरियाणातील हिंसाचारावर विहिंप आणि बजरंग दलाच्या समर्थकांनी राष्ट्रीय राजधानीत सुमारे 30 ठिकाणी निदर्शने आणि आंदोलनं सुरु आहेत. हरियाणामध्ये झालेल्या हिंसाचारात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचसोबत मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, हरियाणाच्या नूंहमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दिल्लीला लागूनच असलेल्या गुरुग्राममध्येही यावरुन जोरदार राडा झाला. हरियाणातील या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ४१ एफआयआर दाखल करत ११६ जणांना अटक केली आहे. तसंच या हिंसाचार प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.