Bigg Boss OTT 3 ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. अवघ्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या या शोची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. नुकताच "विकेंड का वार" पार पडला. यावेळी होस्टिंग अनिल कपूर करत आहे. शोमधून रविवारी आणखी एका स्पर्धकाला घरचा रस्ता धरावा लागला आहे. आतापर्यंत तीन स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. आता चौथी स्पर्धक मुनिषा खतवानी आहे. मुनिषाला कमी वोट्स मिळाल्यामुळे तिला घराबाहेर पडावे लागले आहे.
यंदाच्या आठवड्यामध्ये, घराबाहेर जाण्यासाठी सना सुलतान आणि मुनिषा खतवानी या दोघांचीही घराबाहेर जाण्यासाठी चर्चेत होत्या. पण अनेक स्पर्धकांनी सना सुलतानीला व्होट्स करत तिला सेफ ठेवले. "विकेंड का वार" मध्ये, सना सुलतानीला १३ पैकी १० मत तर मुनिषा खतवानीला फक्त ३ मत मिळाली आहेत. त्यामुळे मुनिषाला घराबाहेर जावं लागलं. अनिल कपूरने तिच्या नॉमिनेशनची घोषणा केल्यानंतर तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर येण्यास सांगितले. बिग बॉसच्या घरातून बाहेर येण्यापूर्वी मुनिषा विशाल पांडे, लवकेश आणि सना यांना मिठी मारून रडली.
अनिल कपूरच्या शोमधून बाहेर पडणारी मुनिषा खटवानी ही चौथी स्पर्धक आहे. तिच्या आधी बिग बॉसच्या घरातून ३ स्पर्धकांना शोमधून नॉमिनेट केले आहे. सर्वप्रथम हरियाणाचा बॉक्सर नीरज गोयत, नंतर अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक हिला घरातून नॉमिनेट केले. तिसरी आणि शेवटची स्पर्धक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री पौलोमी दासला बिग बॉसच्या घरातून नॉमिनेट केले आहे.
रविवारी झालेल्या'विकेंड का वार' एपिसोडमध्ये, अरमानची पहिली पत्नी पायल मलिक आली होती. यावेळी तिने भर एपिसोडमध्ये विशाल पांडेविषयी काही गौप्यस्फोट केले होते. विशालला अरमानची दुसरी पत्नी कृतिका आवडते, असा तिने खुलासा केला. या प्रकरणावरून अरमान मलिक आणि विशालमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामध्ये अरमानने विशालच्या कानाखालीही मारली होते. त्यामुळे अरमान मलिकला घरातून हाकलून द्यावे, अशी मागणी फक्त बिग बॉस स्पर्धकच करत नाहीये तर अनेक चाहतेही करीत आहेत. दरम्यान, बिग बॉसने शिक्षा देताना अरमान मलिकला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले आहे. यापुढे तो प्रत्येक आठवड्याला नॉमिनेट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.