Shehnaaz Gill And Ranvir Shorey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3: शहनाज गिलचा दयाळू भाव, बिग बॉस OTT3 मधील एक सुंदर क्षण

Shehnaaz Gill : बिग बॉस ओटीटी 3च्या एका भागात एक हृदयस्पर्शी क्षण बघायला मिळाला आहे. बिग बॉसची माजी स्पर्धक शहनाज गिलने शोमधील सध्याचा स्पर्धक रणवीर शौरीला डिझायनर सूट भेट देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

Sejal Purwar

लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटी 3 नाट्यमय घडामोडींसाठी चर्चेत आहे. अलीकडेच बिग बॉस ओटीटी 3च्या एका भागात एक हृदयस्पर्शी क्षण बघायला मिळाला आहे. बिग बॉसची माजी स्पर्धक शहनाज गिलने शोमधील सध्याचा स्पर्धक रणवीर शौरीला डिझायनर सूट भेट देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

"वीकेंड का वार" या भागादरम्यान, रणवीर शौरीने नेव्ही ब्लू सूट परिधान केला होता आणि इतर स्पर्धकांकडून प्रशंसा मिळवली होती. सुरुवातीला रणवीरला वाटले की हा सूट शहनाज नावाच्या डिझायनरचा आहे, परंतु नंतर हे समोर आले की तो सुट स्वतः अभिनेत्री शहनाज गिलने दिलेली भेट आहे. रणवीरने खूप आनंदित होत सर्वांसमोर शहनाजचे आभार मानले आहेत.

शहनाझच्या या भावाची चाहत्यांनी प्रशंसा केली आहे. विशेषत: बिग बॉस 13 मधील तिच्या स्वत: च्या इतिहासा संदर्भात सर्वांना माहिती आहे. शोमध्ये असताना, शहनाजला डिझायनर कपडे मिळवण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. ती अनेकदा साधे पोशाख परिधान करताना दिसली होती. त्यावेळी सहकारी स्पर्धक असलेल्या माही विजने तिला कपडे भेट देऊन मदत केली होती.

शहनाजच्या दयाळू भावाने शोमधील स्पर्धकांचे संबंध अधोरेखित केले आहेत. वेगवेगळ्या सीझनमधील असूनही, शहनाज आणि रणवीर यांनी शोच्या पलीकडे असलेली मैत्री टिकवूण ठेवली आहे. शहनाजच्या या भेटवस्तूने रणवीरला खुप आनंद झाला आणि ही भेट हृदयस्पर्शी असल्याचे म्हणत त्याने सोशल मीडियावर शहनाजसाठी कृतज्ञता व्यक्त केली.

या क्षणाने बिग बॉसची एक भावनिक बाजू देखील समोर आली. हा कार्यक्रम अनेकदा नाटक आणि संघर्षांशी संबंधित असल्याचे आपण बघतो मात्र या भावनिक क्षणाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. शहनाज गिलने रणवीर शौरीला दिलेली भेट हा एक हृदयस्पर्शी क्षण आहे. या क्षमाने चाहत्यांच्या हृदयावर ताबा मिळवला आहे. सर्व देशात शहनाजचे कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

Maharashtra Live News Update : पुणे तिथे काय उणे..पुण्याच्या करवंदे काकांनी सिंहगड किल्ला केला १ हजार ७०६ वेळा सर

Diwali 2025: दिवाळीत मातीचेच दिवे का लावतात? त्याचे फायदे काय?

Saree Dress Design: आईच्या जुन्या साड्यांपासून तयार करा 'हे' ट्रेंडी ड्रेस; कोणत्याही सणांसाठी आहे कम्फर्टेबल आणि बेस्ट

SCROLL FOR NEXT