Accident Or Conspiracy Godhra Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Accident Or Conspiracy Godhra चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज; पाहा Video

Accident Or Conspiracy Godhra Trailer Out : २००२ मध्ये झालेल्या गुजरातमध्ये गोध्रा प्रकरण घडले होते. या प्रकरणावर आधारित ‘ॲक्सिडंट और कॉन्स्पिरसी गोध्रा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे.

Chetan Bodke

२००२ मध्ये झालेल्या गुजरातमधील गोध्रा प्रकरण आजही लोकांच्या स्मरणात आहे. या दुर्घटनेची जखम आजही भरून निघालेली नाही. या घटनेवर आजवर अनेक चित्रपट रिलीज झालेले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्या चित्रपटाचे नाव ‘ॲक्सिडंट और कॉन्स्पिरसी गोध्रा’ (Accident Or Conspiracy Godhra) असं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. अवघ्या काही तासांपूर्वीच हा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे..

दीड मिनिटांच्या ह्या ट्रेलरमध्ये नेमकं हे प्रकरण कसं झालं ? याबद्दलची चर्चा कोर्टरूममध्ये होताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना घटनेशी निगडित बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींची झलक पाहायला मिळते. २००२ च्या गोध्रा दुर्घटनेच्या सत्य घटनांवर बेतलेला असल्याचा दावा ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. साबरमती एक्स्प्रेस, कोच एस६, ५९ हे आकडे अत्यंत ठळकपणे यात दाखवण्यात आले आहेत. या ट्रेलरमधील संवादाचे सध्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. या घटनेमागील अनेक विविध पैलू चाहत्यांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळणार आहेत.

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत बिग बॉस ओटीटी ३ फेम अभिनेता रणवीर शोरे आहे. याशिवाय मनोज जोशी, गणेश यादव, हितू कनोडिया, गुलशन पांडे हे कलाकार ‘ॲक्सिडंट और कॉन्स्पिरसी गोध्रा’ (Accident Or Conspiracy Godhra) चित्रपटात झळकत आहेत. हा चित्रपट १२ जुलै २०२४ ला रिलीज होणार आहे. चित्रपटात, रणवीर शौरीने एका वकिलाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पीडितांच्या न्यायासाठी लढण्याचा प्रवास दाखवतो.

नेमकी घटना काय आहे ?

27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्राहून अहमदाबादला जाणाऱ्या साबरमती एक्सप्रेस ट्रेनला लागलेल्या आगीत 59 जणांचा मृत्यू झाला होता. या वेदनादायक घटनेला गुजरात दंगल असेही म्हणतात. ही घटना गोध्रा हत्याकांडाने देखील ओखळली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT