Bigg Boss OTT 3 Grand Finale News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3 : ‘बिग बॉस ओटीटी ३’चा ग्रँड फिनाले केव्हा, कधी आणि कुठे? ट्रॉफीवर कोण नाव कोरणार ?

Bigg Boss OTT 3 Grand Finale : गेल्या अनेक दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी ३’ची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अखेर मोठ्या वादानंतर ‘बिग बॉस ओटीटी ३’ आता संपणार आहे.

Chetan Bodke

अवघ्या काही तासातच आपल्याला सर्वांना ‘बिग बॉस ओटीटी ३’ला फायनलिस्ट मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी ३’ची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अखेर मोठ्या वादानंतर ‘बिग बॉस ओटीटी ३’ आता संपणार आहे. जाणून घेऊया, केव्हा आणि कधी हा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यासोबतच ग्रँड फिनाले कुठे पाहता येणार ? हे सुद्धा जाणून घेऊया...

यंदाच्या सीझनमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर हा सीझन ४ ऑगस्टला पार पडणार, अशी चर्चा सुरू होती. पण ‘बिग बॉस ओटीटी ३’चा ग्रँड फिनाले ४ ऑगस्टला नाही तर, २ ऑगस्टला अर्थात आज पार पडणार आहे. ४ ऑगस्टला (रविवार) ‘बिग बॉस ओटीटी ३’चा ग्रँड फिनाले पार पडणार असं बोललं जात होतं. पण स्वत: अनिल कपूर यांनी ‘बिग बॉस ओटीटी ३’चा ग्रँड फिनाले २ ऑगस्टला होणार असं सांगितलं आहे.

‘बिग बॉस ओटीटी ३’च्या ग्रँड फिनालेमध्ये, सना मकबूल, नॅजी, रणवीर शौरी, साई केतन राव आणि कृतिका राव हे स्पर्धक टॉप ५ फायनलिस्ट आहेत. या टॉप ५ स्पर्धकांपैकी कोण ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विशाल पांडे घरातून एलिमिनेट होताच नेटकऱ्यांनी ‘बिग बॉस ओटीटी ३’ बॅन करण्याची मागणी केली. हा सीझन जियो या ओटीटी ॲपवर स्ट्रीम होत आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या गेल्या सीझनच्या फायनलिस्टला २५ लाख रुपये फी मिळाली होती. त्यामुळे यंदाही विजेत्याला केवळ २५ लाख रुपये मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT