Bigg Boss OTT 2 Finalist: हे आहेत 'Bigg Boss OTT 2'चे टॉप 5 फिनॅलिस्ट; जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार ग्रँड फिनाले?

Bigg Boss OTT 2 Finalist : बिग बॉसच्या इतिहासात ही दुसऱ्यांदा हा हा शो OTT अॅपवर प्रसारित होणार आहे.
Bigg Boss OTT 2 Top 2 Finalist
Bigg Boss OTT 2 Top 2 Finalist Instagram @officialjiocinema
Published On

Bigg Boss OTT 2 Finale Update:

बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा शेवट जवळ आला आहे. प्रेक्षक टायटल कोण जिंकणार आणि कोणाला किती पैसे मिळणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. हा भारतातील लाखो चाहते असलेला प्रचंड लोकप्रिय असा रिअॅलिटी शो आहे.

आवडत्या स्पर्धकांना शोमध्ये त्यांचे बेस्ट प्रदर्शन करताना पाहण्यासाठी प्रेक्षक न चुकता हा शो पाहत असतात. याशिवाय, लोक सलमान खानला शोचा होस्ट म्हणून पाहण्यासाठी खुप एक्साईटेड असतात. मतभेद, त्रास, वाद आणि अनेक संघर्षांनी भरलेल्या प्रवासानंतर, सलमान खान-होस्ट करत असलेला शो त्याच्या ग्रँड फिनालेसाठी सज्ज होत आहे.

Bigg Boss OTT 2 Top 2 Finalist
HBD Suniel Shetty : सुनील शेट्टी ठरला सलमानसाठी देवदूत; गरीबीचे दिवस आठवून अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी

गेल्या वीकेंड का वार भागात, डबल एलिमिनेशन झाले, जद हदीद आणि अविनाश सचदेव बिग बॉसच्या घराबाहेर गेले. काल, आठवड्याच्या मध्येच जिया शंकरला बिग बीच्या घरातून काढून टाकण्यात आले.

अभिषेक मल्हान उर्फ ​​फुक्रा इन्सान, एल्विश यादव, मनीषा राणी, पूजा भट्ट आणि बेबीका धुर्वे यांना अंतिम फेरीत स्थान मिळाले. फुकरा इन्सान हा रिअॅलिटी शोचा पहिला फायनलिस्ट आणि घरचा शेवटचा कॅप्टन ठरला.

अभिषेक मल्हान नेहमी कामाच्या बाबतीत इतर स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये पूजा भटवर मात केल्यानंतर अभिषेकही शोचा पहिला फायनलिस्ट बनला आहे. (Latest Entertainment News)

Bigg Boss OTT 2 Top 2 Finalist
Maharashtrachi Hasyajatra New Season: महाराष्ट्र पुन्हा खळखळून हसणार; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील कलाकार हसविण्यासाठी सज्ज

एल्विश यादव

एल्विश यादव, वाइल्डकार्ड असला तरीही, त्याने बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासूनच ओटीशियनांना आश्चर्यचकित केले आहे. अविनाश सचदेवा सोबतचे त्याचे भांडण असो किंवा बेबीका ध्रुव बद्दलचे त्याचे रिमेक असो, गेल्या काही आठवड्यांपासून एल्विशने स्वतःला प्रकाशझोतात ठेवण्यास यश मिळवले आहे. एल्विश यादवची रिअ‍ॅलिटी प्रोग्राम जिंकणारा पहिला वाइल्ड कार्ड होण्याची शक्यता आहे.

पूजा भट

पूजा भट ही चाहत्यांची सर्वात प्रिय बिग बॉस OTT 2 स्पर्धकांपैकी एक आहे. सह-स्पर्धकांना मानसिक त्रास देण्यापासून ते त्यांना नियंत्रित करण्यापर्यंत अनेक गोष्टी करून अभिनेत्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

तिच्या बेधडक वृत्ती आणि स्पष्टवक्ते विचारांसाठी पूजाचे कौतुक केले जाते. पूजाने शोच्या सर्व उमेदवारांसोबत स्टॉंग बॉंड निर्माण केले आहेत. शोमधील आणि जिंकण्याच्या शर्यतीत पूजा सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक आहे. अंतिम फेरीत प्रवेश करणारी ती दुसरी स्पर्धक होती.

मनीषा राणी

मनीषा राणी, एक प्रसिद्ध सोशल मीडिया इंन्फ्लुएन्सर आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या घरातील तिचा गेम प्लॅन चर्चेत आहे. तिच्या बिंदास्तपणामुळे तिचे लाखो चाहते आहेत आणि तिच्या उत्कृष्ट फॅशन सेन्सचे सर्वत्र कौतुक होत आहे. ती या सीजनमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे आणि तिला जिंकण्याची दाट शक्यता आहे. बेबीका धुर्वे आणि एल्विश यादव यांच्याशी तिचा बॉंड खुप स्टॉंग आहे. त्यांना गेममध्ये मदत करण्याचा प्रयत्न करते.

बेबीका धुर्वे ही प्रसिद्ध भारतीय टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी 2 मधील टॉप तीन फायनलिस्टपैकी एक आहे. बेबीका, मनीषा राणी आणि पूजा भट्ट यांच्यासोबत उत्तम बॉन्ड शेअर करते. परंतु तिचा अभिषेक मल्हानसोबत तिचे वैर आहे.

दरवर्षी बिग बॉस विजेत्याचे अभिनंदन करण्यासाठी मोठी रक्कम आणि एक आकर्षक रक्कम दिली जाते. यावर्षी, बिग बॉस OTT सीझन 2 च्या विजेत्याला "बिग बॉस OTT ट्रॉफी"सह पंचवीस लाखांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.

रोख बक्षीसाची रक्कम शोच्या निर्मात्यांनी कधीही अधिकृतपणे उघड केली नाही, परंतु बिग बॉस ओटीटी 2 च्या एका भागामध्ये मनीषा राणीला अभिषेक मल्हानशी बोलताना आणि बक्षीसाच्या रक्कमेविषयी चर्चा करताना दिसले. शोच्या विजेत्याला त्यांच्या संपूर्ण आयुष्याभर ग्रोसरी देखील देण्यात येणार आहे.

बिग बॉस OTT सीझन 2, सलमान खानने होस्ट केला, Jio सिनेमावर याचा ग्रॅंड प्रीमियर फुकट पाहता येणार आहे. बिग बॉसच्या इतिहासात ही दुसऱ्यांदा हा हा शो OTT अॅपवर प्रसारित होणार आहे. हा शोचा फिनाले होस्ट सलमान खानच होस्ट करत असून 14 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजेच येत्या सोमवारी पार पडेल. हा रिअॅलिटी शो रात्री ९ वाजल्यापासून प्रसारित होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com