Bigg Boss OTT 3 Promo Released Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3 चा प्रोमो रिलीज; शोमधून सलमान खानची एक्झिट, 'मिस्टर इंडिया' सांभाळणार होस्टिंगची धुरा

Bigg Boss OTT 3 Promo Out : जिओ सिनेमाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस ओटीटी ३'चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. शोमध्ये होस्ट म्हणून सलमान खान दिसणार नसून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध सेलिब्रिटी दिसणार आहे.

Chetan Bodke

लवकरच 'बिग बॉस ओटीटी ३' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या जूनपासून प्रेक्षकांना 'बिग बॉस ओटीटी ३' पाहायला मिळणार आहे. नुकताच जिओ सिनेमाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस ओटीटी ३'चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

नुकताच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना होस्ट म्हणून सलमान खान नाही तर, बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर दिसेल. प्रोमो जरीही शेअर केला असला तरीही अद्याप निर्मात्यांकडून त्याची रिलीज डेट जाहीर केलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते 'बिग बॉस ओटीटी ३'च्या प्रोमोची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो प्रोमो आलेला आहे. सध्या सलमान खान त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे तो 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये होस्टिंग करणार नाही.

जिओ सिनेमाच्या इंस्टाग्राम पेजवर निर्मात्यांनी प्रोमो शेअर केलेला आहे. या प्रोमोमध्ये त्यांनी म्हटलं की, 'बिग बॉस ओटीटी ३'च्या नवीन सीझनसाठी एक नवीन होस्ट आणि बिग बॉस प्रमाणे त्याचा आवाजच पुरेसा आहे. 'बिग बॉस ओटीटी ३' जूनमध्ये Jio सिनेमा प्रीमियमवर येत आहे. प्रोमोमध्ये 'बिग बॉस ओटीटी ३'ची रिलीज डेट जाहीर केलेली नाही. पण प्रोमोमध्ये निर्मात्यांनी जून २०२४ मध्ये कोणत्याही तारखेपासून हा शो टेलिकास्ट होण्याची शक्यता आहे. 'बिग बॉस ओटीटी ३' साठी करण जोहर किंवा सलमान खानच्या ऐवजी अनिल कपूर शो होस्ट करणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये आशिष शर्मा, प्रतीक्षा होनमुखे, शहजादा धामी, विकी जैन, शीझान खान आणि अरहान बहल यांसारखे सेलिब्रिटी या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT