Elvish Yadav Registerd FIR  Instagram
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे १ कोटींच्या खंडणीची मागणी, गुन्हा दाखल

Elvish Yadav News: एका अज्ञात व्यक्तीने एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे.

Chetan Bodke

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav

एल्विश यादव (Elvish Yadav) सोशल मीडियावर ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता (Bigg Boss OTT Winner) झाल्यानंतर प्रचंड चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर एल्विश यादवची फॅनलिस्टमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

चाहत्यांच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखला जाणारा एल्विश एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. काही अज्ञातांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे.

गुरुग्राम पोलिसांनी (Gurugram Police) ‘बिग बॉस OTT २’ आणि इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) एल्विश यादवच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

25 ऑक्टोबर रोजी एल्विशला एका अनोळख्या व्यक्तीचा फोन आला. हा फोन वझिराबाद गावाजवळून आल्याची माहिती मिळत आहे. त्या अनोळखी व्यक्तीने एल्विश कडून एक कोटी रुपये देण्याची मागणी केली. हा फोन नेमका त्यांना कोणी केला? याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एल्विशने गुरुग्रामच्या सेक्टर ५३ पोलीस ठाण्यामध्ये त्या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात ३५८ क्रमांकाचा गुन्हा दाखल केला आहे.

कोण आहे एल्विश यादव? (Who Is Elvish Yadav)

एल्विश यादव हा एक सोशल मीडियाचा इन्फ्लूएंसर आणि YouTuber आहे. त्याचे स्वत:चे दोन यूट्यूब चॅनल असून ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता सुद्धा आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरातून बाहेर आल्यानंतर एल्विश यादवच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढली. एल्विश यादवने २०१६ मध्ये यूट्यूब जगतात एन्ट्री केली होती. तो युट्यूबवर कायमच कॉमेडी व्हिडीओ शेअर करतो, त्याचे युट्यूबवर १४.५ मिलियन्स इतके सब्सक्रायबर आहेत. (Social Media)

‘बिग बॉस ओटीटी २’नंतर एल्विश यादवने दुबईमध्ये एक आलिशान घर देखील खरेदी केले आहे, ज्याची किंमत कोट्यवधीं इतकी आहे. एल्विश यादव कायमच त्याच्या लक्झरी लाईफमुळे चर्चेत राहतो. त्याला लक्झरियस कार्सचा खूप शौक असून त्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. एल्विश यादवच्या कार कलेक्शनमध्ये अनेक देशी-विदेशी ब्रँडच्या कार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी सदस्यांची झोप उडाली; बिग बॉसच्या घराचं दार बंद, कोणता टास्क रंगणार?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT