Salman Khan And Elvish Yadav Controversy  Instagram @beingsalmankhan
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 : एल्विश यादवला फटकारनं 'भाईजान'च्या आलं अंगाशी; गोल्डी ब्रारने ट्वीट करत सलमान खानला धमकावले

Elvish Yadav Army : एल्विश आर्मी सलमान खान विरोधात कमेंट करत आहेत.

Pooja Dange

Salman Khan Slam Elvish Yadav : 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये रोज नवीन ड्रम ड्रामा पाहायला मिळत आहे. स्पर्धकांचा ड्रामा शोला टीआरपी मिळवून देत आहे. प्रत्येक वेळी शो शोमध्ये काहीतरी ना काही घडतच. गेल्या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने एल्विश यादवला फटकारले आणि त्यामुळे त्याचे चाहते संतापले आहेत.

यासह त्यांनी एल्विशला घराबाहेर पाठवावे अशी मागणी केली आहे. बिग बॉस इथपर्यंत येण्यामागे सलमान खान हे एक कारण आहे आणि तो गेल्या अनेक वर्षांपासून 'बिग बॉस' होस्ट करत आहे, पण यावेळी एल्विश यादवला फाटकारल्यामुळे सलमान खान फॅन्सच्या रोडवर आला आहे.

एल्विश यादवने बबिका धुर्वेबद्दल अपमानजनक कमेंट केली होती. यानंतर सलमान खानने त्याला खडसावले आणि समजावले देखील होते. वीकेंड का वार एपिसोड दरम्यान हा प्रकार घडला होता, त्यानंतर सलमानविरोधात अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

वीकेंड का वार एपिसोडच्या दुसऱ्याच दिवशी सलमान खानच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फॉलोअर्सची संख्या कमी झाल्याचे लक्षात आले. एका इंस्टाग्राम यूजरने शेअर केले की घटनेपूर्वी अभिनेत्याचे इंस्टावर 66.8 दशलक्ष फॉलोअर्स होते, परंतु एल्विश यादवशी झालेल्या संघर्षानंतर आता तो 63.7 दशलक्षांवर आला आहे.

एल्विसच्या चाहत्यांच्या निशाण्यावर सलमान

'बिग बॉस OTT 2' चा 'वीकेंड का वार' भाग ऑनलाइन प्रसारित झाल्यानंतर लगेचच, एल्विश यादवच्या चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि घरातील यूट्यूबरला सुनावल्यामुळे सलमान खानवर टीका केली.

दरम्यान, एक स्क्रीनशॉट देखील व्हायरल होत आहे, जो कॅनेडियन मॉबस्टर गोल्डी ब्रारने केलेला ट्वीट असल्याचे दिसते. सध्या तो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटमध्ये ब्रार एल्विशवर टीका केल्याबद्दल सलमानवर कारवाईची धमकी देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे ट्विट गोल्डीने केले आहे की अन्य कोणी केले आहे याची पुष्टी अद्याप झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT