Suraj Chavan Meet Kedar Shinde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Meet Kedar Shinde : ‘दगडाला देव बनवणारा! सूरज चव्हाणने घेतली केदार शिंदेंची खास भेट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचे मन भारावले!

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan And Kedar Shinde : सूरजने दिग्दर्शक व निर्माता केदार शिंदे यांची भेट घेतली आहे. याच दरम्यानचा त्यांचा व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. सूरज चव्हाण विजेता झाल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सूरजने त्याच्या हटके अंदाजाने बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांची मने जिंकली. सूरजचे सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नुकतेच सूरजने दिग्दर्शक व निर्माता केदार शिंदे यांची भेट घेतली आहे. याच दरम्यानचा त्यांचा व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.

सूरजने बिग बॉसच्या घरात सहभाग घेतला आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. बिग बॉसनंतरही केदार शिंदे याचं आणि सूरजचं नात खास आहे. नुकताच केदार शिंदे आणि सूरज चव्हाणच्या भेटीचा व्हिडीओ पाहून दिसतं आहे. केदार शिंदे भेटताच सूरजने त्यांना घट्ट मिठी मारली आहे. केदार शिंदे यांनी सूरज गिफ्ट्स देखील दिले आहे.

केदार शिंदे यांनी दिलेल्या गिफ्टबॉक्समध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे. सोनेरी रंगाच्या पादुका देखील आहेत. सूरज देखील हे सर्व गिफ्ट्स स्विकारतो. सोशल मीडियावर अनेकांनी सोशल मीडियावर सूरजच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी "केदार शिंदे सर असंच लक्ष राहु द्या पोरावर", "आयुष्यात फक्त चांगली संगत महत्वाची असते ती तुला आत्ता लाभली भावा असाच पुढे जात रहा", अशा कमेंट करुन सर्वांनी सूरज आणि केदार शिंदेंचं कौतुक केलंय. केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या फिनालेला सूरजवर 'झापुकझुपुक' सिनेमा काढणार असल्याचं सांगितलं. "आयु्ष्यात फक्त चांगली संगत महत्वाती असते ती तुला लाभली..." "आयुष्यात एकतरी केदार शिंदे सर सारखा गुरु भेटणं गरजेचं आहे" अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT