Suraj Chavan  saam tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : "अहो! आय लव्ह यू"; बायकोचे रोमँटिक प्रपोज पाहून सूरजची विकेट पडली, पाहा क्यूट VIDEO

Suraj Chavan Romantic Video : 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण अलिकडेच लग्न बंधनात अडकला आहे. नुकताच त्याने एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात संजना त्याला प्रपोज करताना दिसत आहे.

Shreya Maskar

सूरज चव्हण 29 नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकला.

सूरजने बायकोसोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओत संजना सूरजला प्रपोज करताना दिसत आहे.

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणला 2025 खूप खास ठरले. यावर्षी त्याचा पहिला चित्रपट 'झापुक झुपूक' प्रेक्षकांच्या भेटीला आला. सूरजवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले. त्यानंतर सूरज चव्हाणने आपल्या नवीन घरात गृहप्रवेश केला. त्याच्या आलिशान बंगल्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. आता वर्षाच्या शेवटी सूरज आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न बंधनात अडकला. सूरजने चुलत मामाच्या मुलीसोबत (संजना) लग्नगाठ बांधली. चाहत्यांनी त्यांना भरभरून प्रेम दिले.

सूरज चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याची बायको संजना त्याला प्रपोज करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहून शकता की, संजना लाजत लाजत गुलाबाचे फुल देऊन सूरजला प्रपोज करते. ती म्हणते की, "अहो! आय लव्ह यू" तिचा हा रोमँटिक अंदाज पाहून सूरज घायाळ होतो. त्याला खूप आनंद होतो आणि तो देखील लाजतो. तो म्हणतो की, "किती भारी बोलली. मला खूप आनंद होतोय. मी आज पहिल्यांदा इतका खुश झालो आहे..." या खास व्हिडीओला 'मला वेड लागले प्रेमाचे' हे गाणं लावलं आहे.

सूरज चव्हाणच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते सूरज-संजनचा रोमँटिक अंदाज पाहून चाहते भारावून गेले आहेत. संजनाने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे. तर सूरज शर्ट पॅन्टमध्ये दिसत आहे. दोघे एकत्र खूपच खुश आहेत. व्हिडीओला खूप हटके कॅप्शन देण्यात आले आहे. तिने लिहिलं की, "कसा आहे मग माझ्या बायकोचा प्रपोज..."

सूरजच्या व्हिडीओवर "लाजला बघ, हसला बघ, अग बया ग, सुरज भाऊ...", "एवढा खुश झाला आभाळ पेटलं...", "आपला लाडका सुरज भाऊ आणि संजना", असंच हसत आनंदी राहा.. सुरज दादा देव करो सर्व सुख तुझ्या नशिबात देऊ" चाहते अशा कमेंट्स करत आहेत. सूरज चव्हाणच्या लग्न सोहळ्यात हळदीपासून ते लग्नापर्यंत सर्व समारंभ थाटामाटात पार पडले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Live News Update : बीडच्या मयत ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

SCROLL FOR NEXT